प्रवीण निकनवरे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीवर शोककळा
चित्रा न्युज ब्युरो
मुबई : - रिपब्लिकन पक्षाचे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा सरचिटणीस
प्रवीण नितनवरे यांचे आज हृदय विकाराने दुःखद निधन झाले. प्रवीण नितनवरे रिपब्लिकन पक्षाचे तरुण तडफदार कार्यकर्ते होतें .छत्रपती संभाजी नगर मध्ये त्यांनीं चांगले संघटन उभारले होते. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क होता.
अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले.गंगापूर तालुक्यात छत्रपती संभाजी नगर मधील पंढरपूर वाळुंज एमआयडीसी या भागात त्यांनी चांगली जनसेवा केली .
.प्रवीण नितनवरे सारखा चांगल्या तरुण तडफदार कार्यकर्त्याचे अकाली निधन झाल्याने रिपब्लिकन पक्षाची मोठी हानी झाली आहे अशी शोक भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
प्रवीण निकनवरे यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदेव रामदास आठवले यांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
उद्या सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी दिवंगत प्रवीण नितनवरे यांच्या निवासस्थानी ना.रामदास आठवले हे भेट देऊन शोकाकुल नितनवरे कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.
प्रवीण नितनवरे सारखा चांगला कार्यकर्ता गमावल्याने रिपब्लिकन पक्षाची मोठी हानी झाली आहे रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत मराठवाड्यात विभागात शोककळा पसरली आहे
प्रवीण नितनवरे यांनी छत्रपती संभाजी नगर विभागात चांगले कार्यक्रम आयोजित केले होते .रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनेक चांगली कामे केलेली आहेत .प्रवीण नितनवरे तरुण वयात अकाली गेल्याने रिपब्लिकन चळवळीत तीव्र शोक आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले उद्या दिनांक 13 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी नगर च्या गंगापूर मधील दिवंगत प्रवीण नितनवरे यांच्या निवासस्थानी जाऊन शोकाकुल नितनवरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
0 टिप्पण्या