Ticker

6/recent/ticker-posts

तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा शिरड शहापूर येथे महाप्रसाद वाटप; हजारो भाविक भक्तांनी घेतला“महाप्रसादाचा”लाभ..


श्रीकांत बारहाटे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली

हिंगोली:- जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील श्री सारंग स्वामी यात्रेतील प्रसिद्ध बारा मिसळच्या असलेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या भाजी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी १६ जानेवारी गुरुवार रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान हजारो भाविकांनी  गर्दी केली होती. या दरम्यान तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला आहे.

यावेळी गोबी, टोमॅटो, मेथी, आलू, वांगे, काकडी, मिरची यासह इतर 12 मिसळ ची भाजी एकत्र करून महाप्रसाद तयार करण्यात आला हा भाजी प्रसाद खाल्ल्याने वर्षभर माणूस निरोगी राहतो अशी भाविकांची श्रद्धा आहे दरम्यान नांदेड परभणी, हिंगोली, लातूर, वाशिम जिल्ह्यासह आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राज्यातूनही भाविक या ठिकाणी दाखल झाले होते यादरम्यान या ठिकाणी मोठी यात्राही भरली होती. तर भाजपा वसमत विधानसभा प्रमुख उज्वलाताई तांभाळे पाटील यांच्याकडून भाविकांना पोळ्यांचे वाटप करण्यात आले. श्री संत सारंग स्वामी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाजी वाटपास सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली होती. यादरम्यान भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

या यात्रेनिमित्त दोनशे क्विंटल भाजी व विस क्विंटल पोळी महाप्रसाद म्हणून नुकतेच वाटप करण्यात आले. भाजी महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. थोर संत श्रेष्ठ सारंग स्वामी यात्रेस ९ जानेवारी पासून अखंड शिवनाम सप्ताह व परमहस्य ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. १५ जानेवारी रोजी सायंकाळी थोरला मठ संस्थान वसमत व गिरगाव, सातेफळ, वसा,‌ हयातनगर, फुल कळस, पिंपराळा, सेलू, कुरुंदवाडी, ताडकळस आदी गावातील जवळपास 25 ते 30 दिंड्या पद यात्रेने गावात दाखल झाल्या .या सर्वांचे वीरशैव समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. व सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचे बबन पंढरी बिचेवार यांच्याकडून दरवर्षी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे .आलेल्या दिंड्या घेऊन रात्री पालखी मिरवणूक शिरड शहापूर गावातून सारंगवाडी येथील मठात दाखल झाल्या, यावेळी मोठ्या प्रमाणात भजनी व महिला भजनी मंडळी उपस्थित होते.

१६ जानेवारी रोजी सकाळी श्री च्या समाधीस रुद्राभिषेक ९ ते १० वाजेपर्यंत वाखारी कर यांचे कीर्तन व नंतर धर्मसभा घेण्यात आली. व लगेच भाजी महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. भाजी संस्थांनकडून तर पोळी गेल्या पंधरा वर्षापासून सौ. उज्वला विजयकुमार तांभाळे यांच्याकडून पोळ्याचे वाटप करण्यात आले. यात्रा व भाजी महाप्रसाद वाटप करण्यासाठी विश्वस्त कमिटी मठ संस्थान, वीरशैव समाज व गावकरी मंडळी यांनी अधिक परिश्रम घेतले.

भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे, पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे , नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाब थिटे, जमादार संदीप टाक, गजानन गिरी, दिलीप नाईक, माधव सूर्यवंशी, विलास पाईकराव, सिद्दिकी यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. या दरम्यान तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप केला असल्याची माहिती सारंग स्वामी मठाचे महंत प्रभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी बोलतांना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या