चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भंडारा पोलीस ग्राउंड येथे, भंडारा जिल्हा पालकमंत्री श्री संजय सावकारे साहेब यांचे हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, DHO डॉ.मिलिंद सोमकुवर, CS डॉ. दीपचंद सोयाम, चेअरमन डॉ. अशोकराव ब्राह्मणकर, उपाध्यक्ष डॉ.चंद्रमोहन गुप्ता यांचे उपस्थितीत, सेक्रेटरी डॉ. नितीन तुरसकर यांच्या सहयोगांनी भंडारा जिल्हा रेडक्रॉस सेवक शतकवीर रक्तदूत प्रीतमकुमार राजाभोज यांच्या सह राजूभाऊ खवसकर साहित्यिक, हेमंत चंदावस्कर, रविशंकर साकोरे, श्रीमती मिराभट्ट, सेवकरामजी शाहू, शुभम भेदे यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा व इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा मुख्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिकलसेल व थेलेसिमिया पंधरववाडा, रक्तदान तसेच आसगाव पूरग्रस्तांना अथक प्रयत्नांनी मदत साहित्याचे वाटप करणाऱ्या सेवकांचा या ठिकाणी समावेश होता. माननीय पालकमंत्र्यांनी याप्रसंगी रेडक्रॉस सेवकांना शब्दशुमनांनी शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या