Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोली ते वडसा रेल्वे प्रकल्प: मा.खा. अशोकजी नेते यांची पाहणी व कामाचा आढावा


चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली: गडचिरोली ते वडसा रेल्वे लाईन प्रकल्पाच्या प्रगतीचा कामाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी मा.खा. तथा  राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या साईटला भेट दिली.                                              .                              गोगांव, साखरा व पोर्ला या ठिकाणच्या साईटची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कामाची स्थिती जाणून घेतली व प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील दिशादर्शक उपाय सुचवले.

गडचिरोली ते वडसा रेल्वे प्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देणारा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन रोजगार निर्मितीच्या नवीन संधी निर्माण होतील. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विकासासाठी या रेल्वेमार्गाचे मोठे योगदान ठरेल. मा.खा.अशोकजी नेते यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प गडचिरोलीसाठी विकासाचे नवे दार ठरत आहे. मात्र, पावसाळयापासून व दोन चार महिन्यांपासून व इतर तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम संथगतीने चालू करत थांबले आहे.
या पाहणीदरम्यान, रेल्वे प्रकल्पाच्या अडचणींचा सविस्तर कामाचा आढावा करण्यासाठी मा.खा नेते यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कामाचा आढावा घेतला. प्रकल्पाला वेग देण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी  जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, ॲड. संदीपजी धाईत, रेल्वेचे वरिष्ठ खंड अभियंता आर.पी.सिंग, प्रकल्प व्यवस्थापक अरुणजी जैन, कंत्राटदार जैनल, तसेच स्थानिक पत्रकार कैलास शर्मा उपस्थित होते.

मा.खा.अशोकजी  नेते यांनी पाहणी करत“गडचिरोली-वडसा रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा कणा ठरेल. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढतील, वाहतूक व्यवस्थेत क्रांती होईल आणि स्थानिकांना सुगीचा काळ येईल. त्यामुळे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे,” असे मा.खा. नेते यांनी नमूद केले.

गडचिरोली-वडसा रेल्वे प्रकल्पाला सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक मानले जात आहे. या प्रकल्पासाठी मा.खा. अशोकजी नेते यांचे नेतृत्व व प्रयत्न विशेष चर्चेचा विषय ठरत असून, या दौऱ्यामुळे प्रकल्पाच्या कामाला नव्याने चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.              
 गडचिरोली जिल्ह्याचा विकास हा या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीवर अवलंबून आहे, आणि अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनाने तो लवकरच साकार होईल, अशी स्थानिकांमध्ये अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या