Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : वंचित बहुजन आघाडी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र मध्ये पालघर जिल्हा कोषाध्यक्ष माननीय दयानंद जाधव यांच्या उपस्थितीत, महिलाअध्यक्ष गीताताई जाधव यांच्या नेतृत्वामध्ये, आणि नालासोपारा माजी शहराध्यक्ष समीर शेख यांच्या सहाय्याने नालासोपारा शहराध्यक्ष दयानंद गमरे यांच्या अध्यक्षतेखाली बीजेपी, मनसे, शिवसेना च्या बहुतांशी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नालासोपारा जनसंपर्क कार्यालयात या ठिकाणी संपन्न झाला.

या वेळी वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य पदाधिकारी महासचिव मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष सुविध पवार, उपाध्यक्ष प्रेरणा भेकरे सोबत नालासोपारा विधानसभा अध्यक्ष किरण जाधव, वसई तालुका अध्यक्ष प्रफुल हलदे नालासोपाराचे बहुतांशी पदाधिकारी उपस्थित होते.

नालासोपारा महिला अध्यक्ष प्राजक्ता जाधव सोबत इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या, श्रीधर साळवी गटप्रतिनिधी, सुरेश मंचेकर गटप्रतिनिधी, किशोर खैरे साहेब अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समन्वय समिती. मान. महेश साळवी अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा नालासोपारा शहर आदी उपस्थित होते.
---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या