Ticker

6/recent/ticker-posts

व्यवस्थापन परिषद सदस्य गजानन सानप यांची हकालपट्टी करा


रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची राज्यपालांकडे मागणी

विद्यापीठ प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मार्जितल्या लोकांपुढे लोटांगण घेत असल्याचा आरोप

चित्रा न्युज प्रतिनिधी
छ. संभाजीनगर :- विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकवणाऱ्या राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप यांची सदस्यपदावरून हकालपट्टी करा यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनी राज्यपालांकडे मागणी केली आहे या मागणीबाबत कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्याकडे निवेदन सोपवले.
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदी गजानन सानप यांची निवड झाल्यापासून त्यांनी सातत्याने राजकीय पाठबळ वापरून विद्यापीठाची प्रतिमा मालिन केली असल्याचा आरोप करत श्री.सानप यांनी नुकतेच परीक्षा विभागाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांना अरेरावी केल्याने त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असून यापूर्वीही डॉ.आनंद वाघ व अनेक अधिकारी कर्मचारी यांनी सानप यांच्या प्रशासनातील हस्तक्षेपाच्या लेखी तक्रारी दिलेल्या आहेत त्यावर मा.राज्यपाल कार्यालयाने त्यांना या बाबत मज्जाव केलेला आहे. परंतु सानप यांच्यावर सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त असल्याने प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

मा.कुलगुरू, मा.कुलसचिव हे देखील त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही , विद्यापीठ प्रशासन केवळ विद्यार्थ्यांना धाकात ठेवते पण सत्ताधाऱ्यांच्या मार्जितल्या लोकांपुढे लोटांगण घेत असल्याचा थेट आरोप निवेदनात केला आहे. 
        
       श्री.सानप यांनी प्राध्यापक भरतीस केलेला विरोध हा विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यास रोख लावण्याचा प्रयत्न आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, गोपीनिय कामात ढवळाढवळ करणे, अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना धमक्या देणे असे प्रकार त्यांनी अनेकदा यापूर्वी केले आहेत  शिवाय विद्यापीठाच्या कारभारात ते अनावश्यक हस्तक्षेप करत आलेले आहेत त्यात त्यांना व्यवस्थापन परिषद सदस्यत्व बहाल करण्यात आल्याने त्यांचा हस्तक्षेप अधिक वाढला असल्याने अश्या दादागिरी प्रवृत्तीच्या व्यक्तीस तात्काळ व्यवस्थापन परिषद सदस्य पदावरून दूर करावे अन्यथा या विरोधात राजभवन येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या