चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-उदगीर येथे आरटीओ कार्यालय चालू झाले आणि एम.एच.५५ हा क्रमांक ही मिळाला.यामुळे अवैध लोडेड वाहतूक व अवैध स्कूल बस चालकांवर कारवाई होणार.अशी आशा सर्वसामान्य जनतेला होती. पण म्हणतात ना की,आशा तिथे निराशा असतेच.अगदी असाच कांहींसा प्रकार उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे सुरु असलेल्या अवैध स्कूल बसकडे बघून म्हटले जाते. उदगीर रोड लगत असलेल्या हंडरगुळीतील एका नामांकीत उच्च व उच्च मा.शाळेतील विद्यार्थ्यांची गत कित्येक वर्षापासुन खाजगी वाहनांतुन होणा-या वाहतुकीबद्दल अनेकदा सचिञ अशी पेपरबाजी करुनही तसेच हा प्रकार माहित असुनही आणि याची फोनवरुन माहिती देऊन सुध्दा आरटीओ महोदय याकडे लक्ष का?देईनात.ओव्हर लोडेड व मुदतबाह्य वाहणांची वसुली करण्यात "गुंग" असल्यानेच आरटीओ साहेबांना याकडे लक्ष देता येईना.अशी कुजबुज अवैध विद्यार्थी वाहतुक करणारे कांही चालक व जाणकार जनता करीत आहेत.उदगीरच्या आरटीओ कार्यालयाचे होणारे दुर्लक्ष पाहता विनापरमीट खाजगी वाहनाला उदगीरच्या आरटीओ R.T.O. कार्यालयाच्याच आर्शिवादामुळे विद्यार्थी वाहतूक करीत असल्याचा संशय येतो आहे. "मॅजीक" मधुन
चाकुर तालुक्यातील वडगाव एक्की, बोरगाव,नागदरवाडी, तसेच उदगीर तालुक्यातील मोरतळवाडी,हाळी या व अन्य गावातील विद्यार्थांना अवैध स्कूल बस मधून स.९ वा.आणताना व दु.४ वा. दरम्यान घेऊन जाताना जनतेला दिसते. माञ,संबंधितांना दिसत कसे नाही.का येथील अवैध स्कूल बसचा एखादा अपघात झाल्यावरच संबंधितांना अवैध स्कूल बस दिसणार आहेत का ?
उदगीर रोड लगतच्या त्या शाळेतल्या
या गाड्यांकडे वरिष्ठांनी लक्ष दिले तर आणि तरच बोगस स्कूल बसवर कारवाई होऊ शकते.तसेच जाणुन- बुजुन दुर्लक्ष करणा-या उदगीरच्या आरटीओ कार्यालयाबद्दल असुन अडचण,नसुन खोळंबा.असे म्हटले जातेय.*याबद्दल खेळगे नामक केंद्र प्रमुखाना वाचारलो असता,बोगस स्कूल बस वापरुन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणा-या हंडरगुळीतील त्या नामांकित S.V. शाळेला नोटीस द्या. असे सांगीतलो आहे.अशी माहिती
नितीन लोहकरे (शि.वि.अधिकारी पं.स.उदगीर) यांनी दिली आहे.
या भागाच्या इन्सपेक्टरला सांगुन त्या शाळेतील विनापरमीट स्कूल बसवर कारवाई करण्याचे सांगतो.अशी माहिती... आशिषकुमार अय्यर ( एआरटीओ,उदगीर यांनी दिली आहे .)
0 टिप्पण्या