चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-इयत्ता १२ वी. ची वार्षीक परिक्षा दि.११ पासुन सुरु झाली असुन,शिवाजी उच्च मा. विद्यालय,हंडरगुळी येथील केंद्रावर 195 परिक्षार्थी सीसीटीव्ही, बैठेपथक व पोलीस यांच्या निगराणीखाली परिक्षा देत आहेत.
यंदा काॅपीमुक्त केंद्र व परिक्षा या करीता प्रशासन कठोर परिश्रम घेत असुन,याचाच एक भाग म्हणुन या गावातील केंद्र परिसर व हाॅल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.तर प्रशासनाने नियुक्त केलेले तलाठी कुलदीप गायकवाड यांचे बैठेपथक बसुन होते.तसेच सपोनी.भिमराव गायकवाड,पोउपनी.टोपाजी कोरके यांनी व जिल्हा,तालुका क्रिडाधिकारी यांच्या भरारी पथकांनी येथे भेट देऊन केंद्राच्या सिक्यूरिटी ची पाहणी केली.व संबंधितांना सुचना दिल्या.
जमादार एस.पी.दळवे,शिवप्रताप रंगवाळ,काॅन्सटेबल गोरख कसबे, दयानंद सोनकांबळे,बी.अक्केमोड, हवालदार सिध्दू गुद्दे यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.
दरवर्षी प्रमाणे यंदाही परिक्षा केंद्राच्या प्रवेश द्वारा समोर परिक्षा देणा-या मुलांमुलींच्या नातेवाईकांचा मेळा जमल्याचे दिसुन आले.
*केंद्र संचालक तथा एच.एम.रफीक सय्यद, जेष्ठपञकार पप्पू पाटील,रंजित भोसले सर, घटकार सर यांच्या हस्ते परिक्षार्थी मुला-मुलींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.आणि मग परिक्षार्थ्यांची तपासणी करुन हाॅल मध्ये सोडण्यात आले.*
0 टिप्पण्या