चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-येथून जवळ असलेल्या ग्राम गोपिवाडा येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला शंकरपट चे आयोजन केले जाते. या दरम्यान इथे यात्रा असते परंतु यात्रेनंतर मोठयाने इतरत्र कचरा पडून राहते.कमांडो ग्रुप चे संस्थापक यांच्या आहवान पश्चात. ग्राम पंचायत, एमएमपीएल इंडस्ट्रीज,आणि कमांडो ग्रुप कडून व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या प्रसंगी कमांडो ग्रुप चे संस्थापक, माजी सैनिक,सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर डोळस,सरपंच विनायक टांगले,कंत्राटदार संजय शेंडे,योगेश गहाने,आदेश कानतोडे,प्रहरी बहुउद्देशीय संस्थे चे सर्व सदस्य,कमांडो ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या