चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर- अकलूज येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात "सृजनरंग महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील अध्यक्ष म संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शिक्षणाबरोबर विद्यार्थीच्या सुप्त कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या सृजनरंग महोत्सवमध्ये बॉक्स विकेट क्रिकेट स्पर्धा (मुले व मुली), व्हिडिओ रिल मेकींग (तयार करणे) स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, मेहेंदी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा, प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव दि. १४ फेब्रुवारी ते २१ फब्रुवारीपर्यंत या कालावधीत संपन्न झाला. यामध्ये एकू ३९७स्पर्धक सहभागी झालेले होते. या
महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभमहाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. हनुमंत अवताडे, डॉ. सतीश देवकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला. पारितोषक वितरण वाचन महोत्सव समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले. सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक ऑफिस स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.या पारितोषक वितरण समारंभाचे आभार प्रदर्शन डॉ. निवृत्ती लोखंडे यांनी मानले.
या स्पर्धेतील निकाल बॉक्स विकेट क्रिकेट स्पर्धा मुले बी टीम बीएस्सी. भाग २ (प्रथम), बीकॉम भाग ३ (द्वितीय), बीकॉम भाग१ टीम बी (तृतीय), बीकॉम भाग २ टीम ए. (तृतीय) मुली क्रिकेट स्पर्धा -बी.ए. भाग २ (प्रथम), बी.ए. भाग ३ (व्दितीय), बीएस्सी भाग ३ (तृतीय), बी. कॉम भाग १ (तृतीय) पेपर प्रेझेन्टेशन स्पर्धा श्रवणी ढगे बी. कॉम २ (प्रथम), रुक्मिणी वेल्गोंडे बीएस्सी ३ (व्दितीय), हितेश पुंज बी. कॉम ३ (तृतीय) प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धा बीएस्सी रुक्मिणी येल्गोंडे ३ (प्रथम), द्वितीय क्रमांक गौरी कुल्धर्मे बीकॉम २ (व्दितीय), श्रवणी ढगे बी. कॉम २ (तृतीय) मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक साक्षी सावंत बी एस्सी ३ (प्रथम), प्राजक्ता यादव
बी.ए. भाग २ (व्दितीय), सानिया शेख बीकॉम २, सानिया मुलाणी बी.ए. २. वैष्णवी भोसले बी.एस्सी ३. खुशबू तांबोळी बी.ए.२ (तृतीय) वक्तृत्व स्पर्धा -हितेश पुंज बीकॉम ३ (प्रथम), दिव्या जाधव बी.एस्सी ३ (द्वितीय), निकिता चव्हाण बी एस्सी ३ (तृतीय) निबंध स्पर्धा
वैष्णवी शिंदे बी.कॉम ३ (प्रथम), आरती साठे बी.ए.१ (द्वितीय), प्राजक्ता यादव बी ए भाग २. प्राची शिंदे बीकॉम भाग ३ (तृतीय)) मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा सानिया शेख बी.कॉम २ (प्रथम), साक्षी सावंत बीएस्सी ३ (द्वितीय), गौरी लोंढे बी.ए.१, योगेश तुपे बी.ए. भाग २ (तृतीय)
रील मेकिंग सादरीकरण स्पर्धा अलोक गौडे बी कॉम १ (प्रथम), गौरी जडे बीएस्सी १ (द्वितीय), प्राची शिंदे बी. कॉम ३ (तृतीय)) उत्कृष्ट संघव्यवस्थापक प्रा. विनायक माने (बी.कॉम) वर्गनिहाय सर्वसाधारण विजेतेपद
बीएस्सी भाग ३. विभाग निहाय सर्वसाधारण विजेतेपद - कॉमर्स विभाग
0 टिप्पण्या