रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)कोल्हापूर-
चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर :-संपुर्ण महाराष्टामध्ये १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे धाकल धनी यांचा ३२ वर्षांचा धगधगता हिंदवी स्वराज्याचा व १८ पगड जाती समुदायासह स्वराज्यातील रयतेसाठी केलेली धडपड अत्यंत सुरेख माझा राजा आणि राजांचा खरा इतिहास त्यांचा त्याग त्यांची बुद्धिमत्ता त्यांचे शौर्य त्यांचे महान व्यक्तिमत्व चरित्र तमाम बहुजनासमोर आणणे या उद्देशाने “छावा” चित्रपट तयार केलेला आहे या चित्रपटाला भरपूर यश मिळताना दिसत आहे अवघ्या ४ दिवसांत १४६ कोटींची कमाई केली असून त्यातील सर्व कलाकारांनी आपला जीव ओतून काम केले आहे त्यांचे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो परंतु आजही स्वराज्याचे धाकले धनी म्हनताच त्यांचे लहानपणीचा सवंगडी पुढे जावून राजाची सावली बनून अंगरक्षक राजेंचा अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ बहुजन समाजाचा “रायाप्पा महार”या शुर योध्दाचा त्यांचा शौर्याची भुमीका या “छावा” चित्रपटात दाखवलेले नसल्यामुळे जातीयवादी प्रवृत्तीतून खरा इतिहास दडपण्याचा लपवण्याचा खोडसाळ प्रयत्न केल्याचे दिसून येते दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी या चित्रपटामध्ये “रायाप्पा महार” ज्योत्याजी केसरकर आणि कवी कलश यांची व्यक्तिरेखा खरी साकारली नाही यांची थोडी तरी व्यक्ती रेखा साकारायला हवी होती ऐकवीसाव्या शतकात ही भारताची राज्यघटना संपूर्ण जगात बलशाली अभेद लोकशाही असताना सुद्धा अजूनही मन बुद्धी मधून अस्पृश्यता गेलेली नाही म्हणून सदर चित्रपटामध्ये “रायाप्पा महार”हे दाखवले गेले नाही म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)कोल्हापूर जिल्ह्याच्या वतिने तिव्र जाहीर निषेध करतो असे मत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतिश माळगे यांनी व्यक्त केले यावेळी गांधी चौक इचलकरंजी येथे रिपब्लिकन पक्षाचे युवक नेते खंडेराव कुरणे तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तिव्र निदर्शने केली.*
*या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु.सतिश माळगे(दादा),इचल शहर नेते खंडेराव कुरणे,प्रदीप ढाले,बाळासाहेब कांबळे,दस्तगीर बागवान,वसीम कलावंती,गंगाराम बंडगणी,बाबासो कांबळे,अरूणा जाधव,संगीता चव्हाण(माई),सुखदेव सेवाकर,विष्णू अंकूटे,केतन जावळे,मारूती जावळे,आशुतोष जावळे,संजय आवळे,अमर डोणे,बाळकृष्ण हत्तीकर यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थीत होते.
0 टिप्पण्या