चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे -रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा पार पडली.
शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या ठिकाणी झालेल्या अभिवादन सभेमध्ये मुख्य संयोजक इक्बाल शेख, दलित पॅंथर ऑफ इंडियाचे बापूसाहेब भोसले, सुनील शिरोळे, पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, प्रभा अवलेलू, शारदा लडकत, संतोष गायकवाड, अशोक बहिरट, अजय वीरकर, सत्यवान गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या शिवाजीनगर शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
0 टिप्पण्या