ना जातीचे ना पातीचे शिवाजी महाराज रयतेचे - ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा - कष्टकरी,शेतकरी यांची काळजी घेणारे कुळवाडी भूषण, अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करणारे रयतेचे राजे, सर्व धर्माचा आदर करणारे धर्मनिरपेक्ष राजे,महिलांचा सन्मान करणारे आया-बहिणीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती अविचित्य साधून आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडारा शहरातील शुक्रवारी येथिल शिवाजी महाराज यांच्या पुतळाला माल्यार्पण करण्यात आले यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.महाराजांच्या पराक्रमाने,ध्येयधोरणांनी आणि लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित होऊन आपणही समाजासाठी लोककल्याणकारी काम करण्याचा आजच्या दिनी संकल्प करूया आणि ना जातीचे ना पातीचे शिवाजी महाराज राजा रयतेचा होते असे व्यक्तव्य करण्यात आले.या प्रसंगी रोशनी निखाडे,योगिता धांडे,पायल नागलवाडे, मनीषा भांडारकर,शोभा बावनकर,सपना मदनकर,शाफीसा मदनकर,हेमलता मदनकर,स्वमीता मदनकर,सुरेंद्र मोटघरे,संदीप मारबते, यशवंत सूर्यवंशी,नशिकेत मते, विद्यानंद भावसागर,अमित वैद्य,उमेश मोहतुरे,प्रवीण राऊत,आशिष चन्ने, जीवन भजनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या