चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त्य दि.१३ फेब्रुवारी २५ रोजी पोलीस चौकी हंडरगुळी येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी सपोनी.बी.एस.गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना पारंपारीक वाद्य लावावेत.जनतेच्या आरोग्याला हानी पोहचविणारे वाद्य व लाईट म्हणजे डि.जे.व लेझर याचा वापर करु नये.करणा-यावर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे.असा इषारा दिला.तसेच जयंती समतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी आणि सुचना ही ऐकुण घेतल्या. तसेच रॅली, मिरवणुक आदींसाठी रितसर नोंद करा.शांतता व सु —व्यवस्था अबाधित राहील,याची दक्षता घ्या.आणी डी.जे च्या तालावर धांगडधिंगाणा करण्याऐवजी सामाजिक,सांस्क्रतिक कार्यक्रम घ्या.जमा केलेली वर्गणी डी.जे. चालकाच्या घशात घालण्या ऐवजी गरीबांच्या हितासाठी वापरा. यासारख्या सुचना ही सपोनी.बी.एस गायकवाड यांनी उपस्थितांना केल्या *जन सुरक्षा म्हत्वाची:-सपोनी.*
यावेळी पुढे बोलताना लग्नासह विविध जयंती व उत्सव सोहळ्यात प्लाझमा,लेझर व बीम लाईट याचा मोठ्याप्रमाणात वापर होतो.आणि या लाईट्सच्या तीव्र उजेडामुळे लहान मुले,वयस्कर व सामान्य मंडळी यांच्या डोळ्यांना ईजा झाल्या आहेत.तसेच अशा विजे मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ही निर्माण झाल्याच्या घटना राज्यामध्ये घडल्या आहेत.आणि डी.जे.तसेच लेझर बीम लाईट्स वापरणा-यांवर कारवाई पण करण्यात आल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अपवाद फक्त वाढवणा ठाणे आहे.!भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (१) जनते च्या आरोग्यास व जीवितास हानी व धोका होण्याची शक्यता असेल तर प्रतिबंधात्मक आदेश जारी करुन गुन्हे दाखल करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे.त्यामुळे आपल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी आणि जनतेच्या हिता ला व आरोग्याला पोलीस प्रशासन जपत असते.म्हणुन डीजे / बीजे! या सारखे वाद्य व लेझर लाईट वापरणा-यांवर यंदा नक्कीच गुन्हे दाखल करणार आहे.असा इषारा ही सपोनी.बी.एस.गायकवाड यांनी या बैठकीत बोलताना दिला आहे.
पोहेकाॅ.संजय दळवे-पाटील, शिवप्रताप रंगवाळ,पोकाॅ.दयानंद सोनकांबळे,गोरख कसबे यांच्या सह जेष्ठ पञकार पप्पु पाटील, रोहिदास कलवले,फारुख शेख, मयुर पाटील, अनिकेत भोसले, जंन्टू माने,जिवन माने यांच्यासह शेकडोसर्वधर्मीय नागरीक यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या