मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव: - तुळजापूर तालुक्यातील
अणदूर येथील राजाराम अंबादास चंदनशिवे यांची संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी महाराष्ट्र संकल्प बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष उमेश काळे साहेब यांनी चंदनशिवे यांची निवड केली.यावेळी संकल्प बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ झाकिर शेख, धाराशिव जिल्हा अध्यक्ष आर एस गायकवाड , नळदुर्ग नगर परिषद माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर खंडु गायकवाड, राहुल कांबळे वंचित बहुजन आघाडी तुळजापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख, अणदूर नळदुर्ग येथील राज मिस्त्री,सेट्रिंग मिस्त्री, उपस्थित होते, चंदनशिवे यांची तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अणदूर व परिसरातील अनेक सामाजिक मंडळ आणि प्रतिष्ठित मान्यवर चंदनशिवे यांचं अभिनंदन केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अणदूर व परिसरातील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंदनशिवे यांनी अनेकांना बांधकाम मिस्त्री सेंट्रिग मिस्त्री कामगार म्हणून रोजगार मिळवून दिला आहे.
सध्या त्यांच्या कडे ४० मंजूर काम करतात.
अणदूरच्या परिसरात खात्रीशीर गुत्तेदार म्हणून त्यांचा लौकिक आहे.
संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून ते निश्चितच बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देतील.अणदुर येथील मराठवाडा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष राजाराम अंबादास चंदनशिवे यांची संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल बांधकाम कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उस्मान नदाफ,बाबु नदाफ, नागनाथ कांबळे,प्रकाश बंदपट्टे यांनी त्यांचें अभिनंदन केले.
0 टिप्पण्या