Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत बोर्डा येथील झालेल्या कामाची चौकशी करून निधी वसूल करण्यात यावी- पत्रकार परिषदेतून आरोप

अविश्वास बिघडला म्हणून उठपठाग करीत आहेत- सरपंच राहुल ठेंगणे

चित्रा न्युज प्रतिनिधी  


भद्रावती /वरोरा : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत बोर्डा येथील सरपंच राहुल ठेंगणे व सचिव सुभाष ताजने यांच्या संगमतातून खनिज विकास निधी अंतर्गत रोडचे ठराव न घेता काम केले. सरपंचाचे कथित काका श्री राजू मिश्रा यांचे सांगण्यावरून त्यांचे खाजगी जागेत बांधकाम करून निधीचा गैरवापर केला. त्याची चौकशी करून सरपंच व सचिव यांच्याकडून निधी वसूल करण्यात यावी. अशी मागणी आज झालेल्या श्रमिक पत्रकार भवनात भूपेंद्र बुरेले उपसरपंच, ऐश्वर्या खामनकर, उमेश देशमुख, रवींद्र देसाई, आनंदराव वानखेडे, प्रतिमा कातकर, गोपिका परचाके, रवींद्र बगडे, या सदस्यांनी केली आहे. सरपंच यांनी ३१/ ०१/ २०२५ ला मासिक सभा घेतली. हजेरी बुकावर सदस्याच्या सह्या घेतल्या परंतु विषयावर सभेत चर्चा केली नाही. व वेळीच प्रोसिडिंग लिहिली नाही. व प्रोसिडिंग वर सदस्याच्या सह्या घेतल्या नाही. आमच्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सचिवास घरी बोलवून प्रोसिडिंगवर लिहिल्या गेले. ग्रामपंचायत बोर्डात मोजा खाजगी येथील गट क्रमांक २४५ क्षेत्र ३.४५हे. आर पैकी २८६ हे आर जमीन अकृषक संबंधित ना हरकत प्रमाणपत्र दिले. यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला. २६जानेवारी २०२५ ची नियमित ग्रामसभा घेतली नाही. २०२३ व २०२४ च्या आर्थिक वर्षाच्या दिवंग निधी खर्च केला नाही. असा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
तर संबंधित गैरव्यवहारा प्रकरणात सरपंच विचारण्यात आले असता. ते म्हणाले की त्यांनी माझ्यावर १३जानेवारीला अविश्वास आणला. परंतु त्यांचा अविश्वास तहसीलदाराने पारित केला नाही. म्हणून उठपठाग काम करीत असून माझ्यावर बिन बुळाचे आरोप लावल्या जात आहेत. सदर प्रोसिडिंगच्या सह्या नेहमीप्रमाणे घेण्यात आल्या . सदर रोडचे काम हे आमदार आंबडकर यांच्या दहा लाखाच्या निधीतून करण्यात आले. त्यात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. २३ तारखेला मीटिंग झाली. त्यावेळेस त्यांनी हा प्रकार का समोर आणला नाही. मला पैसे खर्च करता येत नाही. आणि मला त्याबाबत काही करायचे नाही. त्यांना जे करायचे ते करावे. असा खुलासाही सरपंच राहुल ठेंगणे यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या