Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी
गोरेगाव - तालुक्यातील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी ला रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले तर प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष जे जे पटले, मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, सदस्य हिरालाल महाजन, प्रमानंद तिरेले,वाय एफ पटले, चंन्द्रकुमार चौरागडे शिवराम मोहनकार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की रायतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतीनी रचला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक उत्सासाप्रमाणे आहे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजाची तारेखेनुसार जयंती साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्लावर १९ फेब्रुवारी १६३०मधे झाला शिस्त बध्द लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून ही साजरा केला जातो असे प्रतिपादन केले 
कार्यक्रमाचे संचालन व सचिव सुभाष चौरागडे यांनी केले तर निशांत बिसेन, आशा चेचाने आदींनी सहकार्य केले यावेळी गावातील नागरिक व वाचक विध्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या