चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर नंतर तालुक्यात सर्वात मोठी व प्रसिध्द अशी बाजारपेठ असलेले हाळी- हंडरगुळी या दोन गावामधुन गेलेल्या नांदेड-बिदर राज्यमार्गावर हजारो जणांनी मोठमोठे अतिक्रमण केल्याने या रोडवरुन ये-जा करणारे वाहनधारक व पदचारी यांचा जीव टांगणीला लागला आहे.म्हणुन याची माहिती देऊनही फक्त बघतो,नोटीसा देतो.असे म्हणण्यापलीकडे संबंधित अधिकारी कांहीच करीत नसल्याने अतिक्रमणधारक व अधिकारी यांचे मध्ये "गोड" संबंध तर नाहीत,ना?असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच या जागच्या अतिक्रमणावर कोण व कधी घालणार घाला?याकडे जनतेचे लक्ष आहे.
उदगीर नंतर तालुक्यात मोठी आणि दुरवर प्रसिध्द अशी बाजारपेठ हाळी व हंडरगुळीत असल्याने व राज्यमार्ग शेजारी असल्याने येथे रोज लाखों नागरीक व हजारो वाहने येत,जात असत.म्हणुन येथील राज्यमार्गावर सतत पदचारी व वाहने यांची मोठी वर्दळ असते.तसेच शहरातुन येथील व्यापा-यांचा आलेला माल उतरवुन घेण्यासाठी एका जागी उभारायला ट्रक,टेंम्पो यांना जागाच शिल्लक नसते. कारण,राज्यमार्गाच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण तसेच वाकडी- तिकडी उभा असलेले हातगाडे आण् दोन चाकी गाड्या!यांच्यामुळे राज्य मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते.तरीही वाहतूकीस अडथळा करणा-यांवर कारवाई करणारी यंञणाच येथे नाही.म्हणुनच रोज शेकडो गाड्या बेशीस्तीत थांबतात.तसेच परगावचा एखादा चालक आपली गाडी कांही मिनीट राज्यमार्गालगत उभा करीत असेल तर ही गाडी आमच्या दुकाणा पुढून काढ येथे उभा करु नको.यासारखी उर्मट भाषा स्वत:च्या 7/12 सात / बारा वरची जागा असल्या - सारखे कांही अतिक्रमणधारक वापरतात. तसेच परगावच्या कांही वाहनधारक मंडळीशी येथील कांही अतिक्रमण — धारकांची वादावादी झाल्याची चर्चा हाळीत सुरु आहे.तेंव्हा सध्या होणारी शुल्लक वादावादी भविष्यात होणा-या मोठ्या वादाचे संकेत तर देत नाही,ना!याचा विचार करणार कोण व कधी.एखादा अपघात किंवा मोठा वाद झाल्यावरचं का?असे प्रश्न सुज्ञ हाळीकरामधुन विचारले जातात.. येथून गेलेला राज्यमार्ग हा कर्नाटक, आंन्ध्रप्रदेश व तेलंगणा या परराज्यांकडे जातो.म्हणुन हा मार्ग म्हत्वाचा व वर्दळीचा असल्याने हजारो गाड्या व पदचारी यांची सतत गर्दी असते, पण वाढलेल्या अतिक्रमणामुळे गाडीवाल्यांसह पायी ये-जा करणारे लोकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते.म्हणुन येथील अतिक्रमण व बेशिस्तीत थांबलेले हातगाडे,बाईक्स या विरुध्द विविध माध्यमातुन ओरड करुनही प्रशासन याकडे लक्ष देण्याऐवजी बघतो, नोटीसा देतो.हे एकच उत्तर देण्यापलीकडे सा.बां.खात्याचे अधिकारी गप्पगार का?बसले आहेत. यामागचा "अर्थ" काय..?
तेंव्हा लातुरच्या कर्तव्यदक्ष प्रथम महिला जिल्हाधिकारी सौ.घुगे मॅडम या तरी या गंभीर विषयाची पाहणी करुन अतिक्रमण काढण्याचे आदेश प्रशासनाला देणार का,याकडे जनतेचे लक्ष आहे.
0 टिप्पण्या