Ticker

6/recent/ticker-posts

भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाका;निष्कृष्ट रस्त्यांची चौकशी करा मागणीसाठी आदिवासी संघटनांचे ठिय्या आंदोलन


बोगस कामे खपवून घेणार नाहीत-आदिवासी संघटनांनी दिला अधिकाऱ्यांना दम

चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यांची निष्कृष्ट कामे करणा-या  भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाका,निष्कृष्ट रस्त्याच्या कामांची चौकशी करा व प्रलंबित रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष 
सुशिलकुमार पावरा,बिरबल पावरा राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,गोपाल भंडारीराज्याध्यक्ष ,गणेश खर्डेराज्य उपाध्यक्ष ,धनायुष भंडारी विभागीय उपाध्यक्ष ,किशोर ठाकरे विभागीय कार्याध्यक्ष ,करन सुळे जिल्हा उपाध्यक्ष ,कुंदन मोते जिल्हा कार्याध्यक्ष , सदस्य पप्पू अवाया,कैलास पवार,रमेश पटले अध्यक्ष कोळपांढरी,जगदीश डुडवे,आकाश तडवी आदि बिरसा फायटर्स कार्यकर्ते व भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,योगेश भील तालुकाध्यक्ष ,सुनिल पवार,अजय भील,इकबाल शेख,आतीश चौधरी,विश्वजीत पाडवी आदि भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्यकर्ते तसेच राहूल पटले आदिवासी क्रांती दल,हेराम ठाकरे एकलव्य आदिवासी क्रांती दल,दिलीप महिरे तालुका अध्यक्ष  दलित समाज शहादा ,अनिल कुवर,सुभाष पवार आदिवासी एकता परिषद  व केलापाणी येथील ३० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
                 कालापाणी ते हेंगलापाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा, सौ.हेमलता शितोळे-पाटील ठेकेदार यांना रस्त्यांचे निष्कृष्ट काम केल्याबद्दल व ठेका घेऊन अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल काळ्या यादीत टाका.पुढील एकही रस्त्याचा ठेका देऊ नका.प्रलंबित कामे चांगल्या ठेकेदारांकडून करून घ्या, जरली फाटा ते बाहगाया,कुसुमवाडा ते फत्तेपूर, दरा ते दराफाटा रस्त्याचे निष्कृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा. एक वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला खडीचे ठिगारे पडून असलेले शहादा तालुक्यातील तवळाई ते आंबापूर व म्हसावद ते सुलतानापूर रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा. शहादा तालुक्यातील  कोळपांढरी ते टाकली,शहाणा ते दोंडवाडा, शहाणा ते मतराला, शहाणा ते लंगडी,मंदाणे ते जावदा, मंदाणा ते गोटाळी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा.रस्त्याचे  निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदारांचे बील मंजूर करू नका. रस्त्याच्या कामांत अनाधिकृतपणे  टक्केवारी घेणा-या अधिकारी,कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई करा. चांगले व टिकाऊ रस्ते होण्यासाठी टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा.अशा मागण्या करण्यात आल्या.
                    आंदोलन स्थळी कार्यकारी अभियंता,विविध अधिकारी व ठेकेदार यांनी भेट दिली.मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा  यांना देण्यात आले. अधिकाऱ्यांनी लेखी पत्र  दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.जिल्ह्य़ात कोणत्याही ठिकाणी रस्त्यांचे बोगस काम खपवून घेणार नाहीत, अशी चेतावणी आदिवासी संघटनांनी दिली.या बांधकाम विभागाचे करायचे काय?खाली डोक वर पाय,रस्त्यांचे निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका,भ्रष्टाचार हटाओ, नंदुरबार जिल्हा बचाओ,टक्केवारी पद्धत बंद करा,भ्रष्ट ठेकेदार चलो जाव,रस्त्यांची कामे पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा,अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या