चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे असलेल्या 10 वी,12 वी च्या परिक्षा केंद्रावर प्रशासन नियुक्त बैठे पथक व पोलीस पथक यांच्यासह तिस-या डोळ्यांची {सी.सी.टी.व्ही.कॅमेरे} करडी नजर आहे.यामुळे अल्पबुध्दी असलेले परिक्षार्थी व त्यांचे पालकं हे परेशान तर हुशार बुध्दी असलेले परिक्षार्थी व त्यांचे पालक समाधानी दिसत आहेत.
हंडरगुळी येथील शिवाजी माध्य,व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्य माध्य व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणा-या इ.10 वी,व 12 वी. प्रमाणपञ परिक्षेला सुरुवात झाली असुन,यंदाची परिक्षा दरवर्षी पेक्षा वेगळ्या म्हणजे कडक वातावरणात होत असल्याचे दिसते.याचे कारण म्हणजे प्रशासनाने व परिक्षा मंडळाने घेतलेला काॅफीमुक्त परिक्षा आणि जिल्हा.हा निर्णय होय.
आणि मंडळ प्रशासन यांच्या कडक निर्णयामुळे येथील केंद्रावर दररोज नियुक्त केलेले वेगवेगळे बैठे पथक येत व पाहणी करीत आहे.तसेच सपोनी.भिमराव गायकवाड,पोउपनी टोपाजी कोरके हे ही केंद्राला सतत भेट देतात.तसेच परिक्षा हाॅल व परिसरावर सीसीटिव्ही कॅमे-यांची व हेकाॅ.संजय दळवे,हेकाॅ शिवप्रताप रंगवाळ,पोकाॅ.दयानंद सोनकांबळे, गोरख कसबे,अक्केमोड व होमगार्ड सिध्दू गुद्दे यांची करडी नजर आहे. म्हणुन हे केंद्र आता काॅफीमुक्त झाले आहे.
कारण,या पुर्वी हे केंद्र काॅफीयुक्त म्हणुन संबंधित दप्तरी नोंद झाल्याचे समजते.माञ,यंदा या केंद्रावर तिसरा डोळा व वरील पोलीसं यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळेच काॅफीमुक्त केंद्र ही नवी ओळख या केंद्राला मिळाली आहे.
तिस-या डोळ्यांचा झटका अण् काॅफीबहाद्दरांना बसणार फटका
बोर्डाची परिक्षा म्हटलं की काॅफी होणारचं!असे आजवरचे समिकरण होते.पण यंदा अत्यंत कडक शिस्तीत काॅफीमुक्त परिक्षा,ही मोहीम शासन, प्रशासन सर्वञ राबवित असल्याचे दिसते.आणि या मोहिमेचा म्हत्वाचा पार्ट म्हणजे तिसरा डोळा {कॅमेरा} आहे.आणि येथील केंद्र परिसरात व हाॅल मध्ये असे अनेक डोळे C.C.T.V.कॅमेरे लावलेले असल्याने अल्प,कमकुवत बुध्दी असलेले परिक्षार्थी व त्यांना काॅफी पुरवणारे बहाद्दर हे परेशान झाले असुन,तिस-या डोळ्यांचा मोठा झटका बसुन कमी बुध्दीवाल्या परिक्षार्थ्यांच्या व त्यांच्या शाळेच्या निकालावर ही कॅमे-याचा फटका बसू शकतो.अशी चर्चा ऐकू येत आहे
काॅफीमुक्त अभियानामुळे विद्यार्थी समाधानी,तहसीलदार
हंडरगुळी येथील सेंटरवर 12 वी,10 वी.वर्गाच्या वार्षीक परिक्षेला प्रारंभ झाला असुन,या परिक्षा काॅफीमुक्त वातावरणात होत आहेत.म्हणुन विद्यार्थी व त्यांचे पालक समाधानी दिसतात.व प्रशासनाचे आभार व्यक्त करतात.व काॅफीमुक्त अभियानाचा फायदा हुशार विद्यार्थ्यांना नक्कीच होणार,यात शंका नाही. बोरगावकर तहसीलदार,उदगीर
0 टिप्पण्या