गिरगावात शिवजन्मोत्सवाची धूम; हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिव स्मारक फलकांचे भूमिपूजन..!
श्रीकांत बारहाटे प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली :- महाराष्ट्र देशाची अस्मिता श्रीमंतयोगी, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक, क्षत्रीय कुलावंतसं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अलौकिक आणि भूतपूर्व जन्मोत्सव सोहळा गिरगाव मध्ये पंधरा वर्षांची अखंडित परंपरा राखीत अवूतपूर्व सोहळा गिरगाव नगरीत साजरा करण्यात आला.
शिवरायांच्या शोभा यात्रेचे वर्णन व अखंड हरिनाम सप्ताह पालखीचे वर्णन करायला शब्दही कमी पडावे, एवढा अद्भुत सोहळा गिरगाव वासियांनी आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी अनुभवला.
यामध्ये शिवप्रेमींचा उत्साह, ढोल ताशांचा गजर, टाळ, मृदंग, विणा शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष, बाल शिवाजींच्या वेशभूषातील चिमुकल्यांची झाकी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.
अबाल वृद्धांच्या जयघोषाने गिरगावातील रस्ते अक्षरशहा भगवे झाले होते, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने गिरगाव नगरीत काढण्यात आलेली शिवरायांची शोभायात्रा व अखंड हरिनाम सप्ताह पालखीची मिरवणूक खरोखरच मात्र यावेळी नेत्र दीपक ठरली गेली. शिवजयंती समिती उत्सव गिरगाव गावकरी मंडळी सर्व राजकीय पक्षांमधील नेतेमंडळी, पदाधिकारी, गाव प्रतिनिधी सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, कृषी विभागातील कर्मचारी व तथा कुरुंदा पोलीस ठाण्याचे विशेष कर्मचारी पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सहकार्यासाठी तैनात होते.
प्रतिष्ठित नागरिक, शिवप्रेमी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढाकाराने गाव प्रतिनिधीने भर देत यावेळी शिव स्मारक फलकांच भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले.
यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत फलकांचं अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा जन्म सोहळा गिरगाव नगरीत सण उत्सवाच्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मागील पंधरा दिवसापासूनच गिरगाव सार्वजनिक जयंती समिती व अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने जाणत्या राजाचा जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची पूर्वतयारी करण्यात आली होती. गावातील प्रत्येक रस्ता हा बॅनर आणि भगवा ध्वजांनी सजला गेला होता. शिवप्रेमीच्या अलोट उत्साहाने गिरगावत अत्यंत जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते.
संपूर्ण गिरगाव नगरी शोभा यात्रेसाठी सजली गेली होती, सकाळी अकरा वाजता हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन आरती करून अभिवादन करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांचे समूह हजारो महिला व पुरुषांच्या मुखातून निनादणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अभूतपूर्व ठरला होता.
0 टिप्पण्या