Ticker

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिर हिमायतनगर महाशिवरात्र महोत्सव निमित्त दिनांक 24 पासून भव्य यात्रा महोत्सव यात्रा महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; ७ लाखांची भव्य बक्षीसे ..

लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड  

नांदेड :-हिमायतनगर शहरातील श्रीक्षेत्र परमेश्वर देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान असून येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी दिनांक 24 फेब्रुवारी ते बारा मार्च 2025 दरम्यान भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
     यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी पारायण,कीर्तनासह शालेय विविध गुणदर्शन स्पर्धा, भव्य कबड्डी स्पर्धा, शंकरपट, भव्य भजन स्पर्धा, भव्य पशुप्रदर्शन स्पर्धा महिलांसाठी विविध स्पर्धा,शालेय बडबडगीत स्पर्धा, लहान मुले व मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा, भव्य कुस्ती स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने परमेश्वर मंदिर कमिटी मार्फत यात्रा महोत्सव निमित्त परिश्रम घेतले जात आहेत.
    यात्रा महोत्सवानिमित्त दिनांक 24 फेब्रुवारी रोजी ह भ प मयूर महाराज कोंडे यांचे हरिकीर्तन, दिनांक 25 फेब्रुवारी रोजी ह भ प कोंडीबा महाराज यांची हरिकीर्तन, दिनांक 26 फेब्रुवारी ह भ प पपु बालयोगी गजेंद्र स्वामी यांचे कीर्तन , दिनांक 27 फेब्रुवारी ह भ प महेश महाराज  यांचे हरिकीर्तन, दिनांक 28 फेब्रुवारी रोजी हभप व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर महाराज खोडे यांची हरिकीर्तन, दिनांक एक मार्च रोजी गुरुवर्य ह भ प तानाजी बापू महाराज यांचे हरिकीर्तन, दिनांक 2 मार्च रोजी ह भ प नारायण महाराज गरड यांचे हरिकीर्तन  व दिनांक 3 मार्च रोजी हभप सोपान महाराज सानप शास्त्री यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
      तसेच दिनांक 4 मार्च 2025 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी बडबड गीत स्पर्धा, 6 मार्च 2025 रोजी भव्य पशुप्रदर्शन स्पर्धा, 7 मार्च रोजी शंकर पट स्पर्धा, आठ मार्च रोजी भव्य भजन स्पर्धा, नऊ मार्च रोजी कबड्डी स्पर्धा, 9 मार्च रोजी रात्री आठ ते 11 या वेळेचे शाळे विविध गुणदर्शन स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुले व मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा दिनांक १० मार्च रोजी 11 ते तीन या वेळेत, तसेच 11 मार्च 2025 रोजी कुस्ती स्पर्धा आणि दिनांक 12 मार्च 2025 रोजी यात्रा महोत्सवाचा समारोप होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या