चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर, ता. जि. भंडारा च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे दि. १९ फेब्रुवारी २०२५ ला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष योगेश मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश मेश्राम तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य नरेंद्र गणविर, नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.), संस्था कोषाध्यक्ष ऋषी गोस्वामी, प्रा. डॉ. राहूल भोरे, आर. एम. पटेल कॉलेज भंडारा, प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे, एन. जे. पटेल कॉलेज मोहाडी हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मंजिरी भोरे व मान्यवरांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली. स्वराली भोरे, अस्मिता धारगावे, दिपाली भोरे, लता कठाणे, शुभ्रा सोमनाथे, अंश बोरकर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. राहूल भोरे यांनी केले.
0 टिप्पण्या