Ticker

6/recent/ticker-posts

तथागत विद्यालय, केसलवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात


शिवजयंती उत्साहात साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-तथागत विद्यालय, केसलवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात साजरी केली गेली या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील गावातील गणमान्य व्यक्तींनी उपस्थिती दर्शवून मुलांचा व त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये मुलांना उत्साह द्विगुणित केला .
 या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पद्माकर सावरकर यांनी भूषविले  श्री. विजय सलामे रिटायर्ड पोलीस केसलवाडा, सरपंच श्री. धनराज वलके, उपसरपंच श्री. भीमराव बारसागडे,श्री. मिलिंद  गजभिये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री. बालक गजभिये, श्री. नंदू फुंडे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महेंद्र भेंडारकर  गावातील प्रतिष्ठित  श्री.भास्कर शेंडे,सौ. महंताताई देशपांडे सरपंच चिखली, श्री.मुकेश देशपांडे,श्री. सुरेश काटेखाये पोलीस पाटील चिखली, सौ. शशिकला शिवणकर सरपंच उमरी,श्री. श्रावण भोयर माजी सरपंच उमरी, श्री. पंकज  शहारे कातूर्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये वर्ग 5 ते 7 या गटात प्रथम- गुंजन सुधाकर काटेखाये द्वितीय -वेदांती प्रमोद गाडेकर तृतीय -अंजली सत्यवान गेडेकर यांनी बक्षीसे पटकावली
तर वर्ग 8 ते 10 या गटात
 प्रथम- हिमांशू हंसराज गजभिये द्वितीय- कु. समीक्षा नरेंद्र माटे
 तृतीय -शौर्य रवींद्रकुमार ब्राह्मणकर यांनी पटकाविले या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि रोख रक्कम 501, 401,301 असे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी श्री विजयजी सलामे यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून भविष्याच्या दिशेने वाटचाल करावी असे सांगितले तर श्री. बालक गजभिये यांनी शिवरायांच्या अंगी असणारे गुण विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच आत्मसात करावे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख श्री. प्रदीप गोंडाने सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अविन दिघोरे सर यांनी केले.
विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते व सहकार्यातून कार्येक्रम सुंदर रीतीने साजरा झाला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या