Ticker

6/recent/ticker-posts

"महाराष्ट्र माझा" – एक गौरवशाली संगीत प्रस्तुती

"महाराष्ट्र माझा" – एक गौरवशाली संगीत प्रस्तुती

👉🏻गीतकार: तुका मोहतुरे
👉🏻संगीतकार: केशव खोब्रागडे
 👉🏻गायक : वीरेंद्र बोरडे 

महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेलं आणि त्या भूमीचा गौरव गाणारं एक अत्यंत आत्मीय आणि प्रेरणादायी गीत – "महाराष्ट्र माझा" – महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला रिलीज होतो आहे.
दीर्घ संघर्ष, निष्ठा आणि मेहनतीच्या फलस्वरूप हे गीत साकार झाले असून, त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, शौर्य आणि आत्मा यांचं सुंदर शब्दांकन करण्यात आलं आहे.कवी तुका मोहतुरे याच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत      संगीतकार केशव खोब्रागडे याच्या दिग्दर्शनात प्रसिद्ध गायक वीरेंद्र बोरडे यांनी प्रभावीपणे गायले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हे गीत रसिक श्रोत्यांसमोर सादर करण्याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. हे गीत प्रत्येक मराठी मनाला अभिमानाने उभं राहायला लावेल, हीच अपेक्षा.

आपल्या प्रेमाची आणि शुभेच्छांची आम्हाला वाट या गीतासाठी आहे
लवकरच आपल्या भेटीला – "महाराष्ट्र माझा"! हे गीत महाराष्ट्र दिना निमित्त keshav composer या youtube चॅनेल वर उपलब्ध असणार आहे.

आपला स्नेहकांक्षी 
केशव music composer
9623431870

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या