Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्साहात संपन्न

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ, समिती अकलूज 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज :- अखंड विश्वाला मानवतावादी दृष्टिकोन देऊन अस्पृश्य समाजाला मानवरुपी आत्मभान प्रदान करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व नुकतीच संपन्न झालेली महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून  या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचा *संयुक्त जयंती समारंभ* श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती, अकलूजच्या वतीने श्री लक्ष्मी बालाजी हाॅल, अकलूज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तदनंतर उपस्थित सर्व चर्मकार समाजबांधवांनी अकलूज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी भेट दिली. या प्रसंगी भारतीय संरक्षण दलातील सेवानिवृत्ती मेजर श्री सोमनाथ महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मेजर महाजन यांनी आपल्या भारतीय सैन्य दलातील सेवाकार्यातील आपले अनुभव व्यक्त करुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेतून समता आधारित समाजाच्या विचाराचे माॅडेल नव-महाराष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण समाजाने या महापुरुषांच्या विचारधारेचे आचरण करुन मानवता धर्म वृद्धिंगत करावा असा संदेश या प्रसंगी उत्स्फूर्त मनोगतातून व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी ॲड. भारत गोरवे, पोलीस पाटील श्री शंकर बागडे, डॉ.निवृत्ती लोखंडे यांनी आपले  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री राजाराम गुजर यांनी महापुरुषांच्या जयंती उत्सवाचे औचित्य आणि महत्व विषद केले व या कार्यक्रमाचे अतिशय समर्पक सूत्रसंचालन केले. आभार डॉ.निवृत्ती लोखंडे यांनी मानले.
या प्रसंगी डॉ.दिलीप गुजर, श्री आबासाहेब शिंदे, श्री राजाराम गुजर, श्री गोपाळ मस्तुद, श्री महादेव राजगुरू, श्री शंकर बागडे, श्री भारत गोरवे, श्री अशोक कांबळे, श्री गोपाळ गुजर, श्री श्रीमंत भगत, श्री मोहन भगत, श्री शंकर बामणे, श्री अशोक राजगुरु, मेजर सोमनाथ महाजन श्री निवृत्ती लोखंडे इत्यादी समाजबांधव बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या