Ticker

6/recent/ticker-posts

सिद्धेश्वर सलगर राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर -कै.अजिनाथ केचे प्राथमिक शाळा आलेगाव (खुर्द) ता.माढा,जि.सोलापूर या शाळेतील सहशिक्षक पदावर कार्यरत असलेले सिद्धेश्वर सलगर यांनी विद्यार्थ्यांसाठी कठीण परिश्रम घेत अगदी आपला सकाळचा ज्यादा तासाचा वेळ असू दे किंवा सुट्टीचा वेळ असू दे सर्व वेळ विद्यार्थ्यांसाठी खर्च करून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी राज्य, जिल्हा -तालुका तसेच केंद्र गुणवत्ता यादीमध्ये चमकाविले या कार्याची दखल घेत ज्ञान क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था मंगळवेढा .या संस्थेने त्यांचा राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार देऊन गौरव केला. 
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शफिक शेख, कांबळे ,संस्थेचे सर्व पदाधिकारी व सहकारी शिक्षक मुख्याध्यापक श्री संदीप मिसाळ, श्री अंकुश माने ,श्री पोपट चौरे, पोपट कोकाटे, मारुती धांडोरे
तसेच पालक प्रतिनिधी म्हणून संजय माने ,नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या