विकोजन कंपनीला केला फोन रिसिव्ह करण्यास नकार
पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्षात भेट देऊन केली पाहणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- दिनांक 20 मे 2025 ला भंडारा व पवनी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे सचिन तुकाराम खराबे यांनी मागील तीन महिन्यापूर्वी आपल्या शेतात सोलर पॅनल पंप बसविला परंतु अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे त्यांच्या पंप पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. आज दिनांक 21 मे 2025 ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या सोलर पंप उध्वस्त झाले असून विकोजन कंपनीच्या ऑफिसला संपर्क केला असता ते फोन रिसीव करण्यास नकार देत आहेत .त्यामुळे झालेल्या सोलर पंपाची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न तर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे.विकोजन कंपनीच्या कंपनीच्या ठेकेदारांनी सदर शेतकऱ्याला विम्याच्या लाभ करून देण्यात यावा किंवा झालेली नुकसान पूर्णपणे सुरळीत करून द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्याने केलेली आहे. त्याचप्रमाणे दिनांक 20 मे ला दुपारी तीन वाजता आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात झाडे सुद्धा पडलेली आहेत.घराचे टिनाचे छत उडलेले आहेत त्यांचे सुद्धा सर्वे करून तलाठ्यांनी याकडे लक्ष देऊन त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी.
0 टिप्पण्या