Ticker

चंद्रकांत रघुवंशीविरोधात भारत आदिवासी संविधान सेनेचा एल्गार, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन


तीनपाट चा अर्थ चंदूभैयाने आम्हाला समजावून सांगावे- सतीश ठाकरे प्रदेशाध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा :-आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी शहादा येथील  कार्यक्रमात जाहीर रित्या आदिवासी संघटनांना "तीनपाट" असा जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी आदिवासींचा जाहीर रित्या अपमान केल्याबद्दल ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा,अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेनेकडून या उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,शहादा शहराचे ईकबाल शेख, युवा अध्यक्ष राहूल उखळदे, कार्यकर्ता सुनिल पवार व योगेश चव्हाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिनांक १६ मे २०२५ रोजी चंद्रकांत रघुवंशीविरोधात लेखी फिर्याद शहाद्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना दिली आहे.तरी सदर इसमाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला नाही,ही आदिवासींवर अन्यायकारक बाब आहे.१६ मे २०२५ रोजी आम्ही आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता.म्हणून आम्हाला आम्ही आदिवासी आहोत हे माहित असतांना देखील जाणीवपूर्वक जाहीर ठिकाणी आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक अपमानास्पद शब्द प्रयोग केलेला आहे.तक्रार नोंदवून घेत नाहीत, म्हणून पोलीस ठाण्यातच आदिवासी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.ॲस्ट्रासिटीसारखे गंभीर गुन्हे शहादा पोलीस ठाण्यात नोंदवले जात नाहीत,हे पोलीस ठाणे कुणासाठी? गरीबांसाठी नाही,श्रीमंतांसाठी आहे.पोलीस निरीक्षक जातीभेद करतात, 
असा आरोप सतीश ठाकरे यांनी केला आहे.
             चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींना तीनपाट बोलले आहे,तीनपाट चा अर्थ चंद्रकांत रघुवंशींनी आम्हाला समजावून सांगावे.आमची लेव्हल काढतो,याची लेव्हल आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही.चंदूभैयावर गुन्हा दाखल न केल्यास आदिवासी संघटनांकडून चंद्रकांत रघुवंशीविरोधात व पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार  आहे,असा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेकडून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या