चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती / चंद्रपूर : नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रपूर शहर व चंद्रपूर तालुका
त्रेवार्षिक अधिवेशन एक दिवशीय संयुक्त खदान मजदूर संघ आयटक कार्यालय चंद्रपूर येथे पार पडले
या कार्यक्रमाचे उदघाटक कॉम्रेड रवींद्र उमाटे - राज्य कौन्सीलसदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष चंद्रपूर
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड राजू
गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भद्रावती
प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड रवींद्र उमाटे - राज्य कौन्सिल सदस्य भा क पा चंद्रपूर -- कॉम्रेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भा क पा चंद्रपूर -- कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भा क पा भद्रावती -- कॉम्रेड मल्लेश कमटम जेष्ठ कार्यकर्ते भा क पा चंद्रपूर म्हणून मंचावर उपस्थित होते
सर्व प्रथम कॉम्रेड कार्ल मार्क्स - कॉम्रेड लेनिन - कॉम्रेड एंगेल्स यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आले व पाहुण्यांचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले
उदघाटन भाषण करताना कॉम्रेड रवींद्र उमाटे म्हणाले की खाजगीकरण - उदारीकरण आणि जागतिकिकरण या खाऊजा धोरणाचे भारतीय स्वरूप म्हणजेच अदानीकरण सर्व क्षेत्रातील सार्वजनिक उद्योग गौतम अदानीच्या स्वाधीन करून या क्रोनी क्यपीटलउद्योग समूहाला पाठबळ देणे हा एकमेव उद्योग मोदी सरकारचा आहे आपण आता आपला पक्ष शंभर वर्षात पदार्पण करीत आहे यावर आपण संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या वर्षा पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शंभर शाखा जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे असे ते म्हणाले
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना कॉम्रेड राजू गैनवार म्हणाले की आपला पक्ष हा क्रांतिकारी पक्ष आहे या पक्षात अनेकांनी बलिदान दिले आहे आपण आपले विचार जनतेपर्यंत पोहचविले पाहिजे पक्षाला बळकट केले पाहिजे पक्ष सभासद वाढविले पाहिजे आंदोलनाला तेज धार आणली पाहिजे व नऊ जूनला होणाऱ्या देश व्यापी संपला कामगारांनी संपात सहभागी व्हावे असे ते म्हणाले
यात प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले सर्व विषयावर समस्यावर ठराव एक मताने मंजूर करण्यात आला कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी प्रस्ताव मांडला की शेतीवर होणारे सर्व कामे रोजगार हमी योजना या मधूनच व्हावे आणि यावर सभासदांनी आपापले विचार व्यक्त केले व ठरावावर सविस्तर चर्चा करण्यात आली व नंतर चंद्रपूर शहर व चंद्रपूर तालुका नवीन कार्यकारणी तीन वर्षासाठी करण्यात आली याला सर्वांनी एकमतानी ठराव मंजूर करण्यात आले व पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आले
या कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड आशा झाडे यांनी केले व प्रास्तविक कॉम्रेड विजय कुडे व आभार प्रदर्शन कॉम्रेड सुरेश चवढाल यांनी मानले
हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता कॉम्रेड जयनंदिनी गायकवाड, कॉम्रेड अर्चना आसुटकर, कॉम्रेड माया दुर्योधन, कॉम्रेड किरण चहादे, इत्यादिनी अथक परिश्रम घेतते.
0 टिप्पण्या