Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सिक्कीम चे राज्यपाल ओम माथुर यांची भेट

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई :-रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज सिक्कीम चे राज्यपाल  महामहीम श्री ओम माथुर  यांची आज गंगटोक  येथे सदिच्छा भेट घेतली.यावेळी सिक्कीम च्या विविध विषयांवर आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचा विविध योजनांबाबत  उभयतांमध्ये चर्चा झाली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे; राष्ट्रीय सचिव महेश्वर थाननजॉम  ; विजय बोरा ; रिपब्लिकन पक्षाचे नवनियुक्त सिक्कीम राज्य अध्यक्ष नामग्याल भोतिया;  रिपाइं चे सिक्कीम राज्य सरचिटणीस हरिप्रसाद बुरुम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेमंत रणपिसे 
प्रसिद्धी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या