Ticker

6/recent/ticker-posts

सानगडीतील प्राचीन बाहुलीची ग्रीन हेरिटेज फाउंडेशनने केली पाहणी, जतन व संवर्धनासाठी केले जातील प्रयत्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-प्राचीन काळात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी व लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बाहुली (बावली, बारव किंवा स्टेप-वेल) चे निर्माण केले जात असे. ही एक प्रकारची पायऱ्यांची विहीर असते, ज्यामध्ये पाणीाच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात. ही जल व्यवस्थापनेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. बाहुल्या सामूहिक व सामाजिक वापरासाठी, तसेच धार्मिक स्थळे आणि किल्ल्यांच्या जवळदेखील बांधल्या जात असत.

अशाच प्रकारची एक प्राचीन बाहुली सानगडी गावात आहे, जी सहानगड किल्ल्याच्या जलव्यवस्थेसाठी बांधली गेली असावी, असा अंदाज आहे. ही बाहुली दिसायला दिल्लीतील प्रसिद्ध अग्रसेन बावलीप्रमाणे आहे. गावात दुसरी एक बाहुलीही आहे जी सध्या संपूर्णपणे कचऱ्याने बुजलेली आहे.
सानगडीतील ही बाहुली दगड व चुन्याने बांधलेली असून स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यामध्ये सुमारे ६० पायऱ्या असून, आत मोठमोठे खोल्या, चालण्यासाठी भरपूर जागा आहे. मध्यभागी खोलवर हौद असून तो पाण्याने भरलेला आहे. आजूबाजूला कचरा व झुडुपे उगवलेली आहेत. काही काळापूर्वी *सह्याद्रि प्रतिष्ठान*च्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली गेली होती.
ही एक ऐतिहासिक वारसा स्थळ असून येणाऱ्या पिढ्यांना याचा इतिहास समजण्यासाठी याचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. किल्ल्यासह या वारस्या चे ही जतन, संरक्षण व सौंदर्यीकरण व्हावे म्हणून नुकतीच ग्रीन हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण बाहुलीची पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौर्‍यात फाउंडेशनचे अध्यक्ष व इतिहास संशोधक सईद शेख, अतुल वर्मा, जि.प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रतीक शहारे* हे उपस्थित होते. सानगडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सविता उपरिकर यांनीही यामध्ये सहकार्य केले.
या ऐतिहासिक बाहुलीच्या जतन व संवर्धनासाठी ग्रीन हेरिटेज फाउंडेशनकडून लवकरच प्रयत्न केले जाणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या