Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक सायकल दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा - हॅपी बायसिकल डे.जागतिक सायकल दिन दरवर्षी 3 जून रोजी साजरा केला जातो सायकलींगचे फायदे लोकांना कळावेत हा त्याचा उद्देश आहे सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही तर आपल्या आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे सायकलिंग चे अनेक फायदे आहेत.हे केवळ खरेदी करणे सोपे नाही तर ते तुम्हाला तंदुरुस्त ठेवते आणि पर्यावरणाला हानी पोहोचत नाही.यामुळेच एप्रिल 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

जागतिक सायकल दिवस मानवी प्रगती शाश्वतता सामाजिक समावेश आणि शांतता संस्कृतीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.जागतिक सायकल दिनानिमित्त आपल्या मित्र परिवारास सायकलचे महत्त्व आणि आरोग्याचे फायदे  समजाऊन सांगण्यासाठी तसेच त्यांना जागतिक  सायकलींचे फायदे त्यांना समजावून सांगणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.आज सर्वत्र जागतिक सायकल दिन साजरा होणार आहे.एप्रिल 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.हा दिवस लेसझेक सिबिल्सकी च्या मोहिमेचा आणि तुर्कमेनिस्तान आणि इतर 56 देशाच्या समर्थनाचा परिणाम आहे. गेल्या तीन वर्षात सर्व देश हा दिवस साजरा करतात.हे लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्याची एक थीम निश्चित करण्यात आली आहे.              सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत ज्यामध्ये शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि पर्यावरणाचा विचार समाविष्ट आहे.सायकल चालवण्याने हृदयविकार मधुमेह लठ्ठपणा आणि स्ट्रोक यासारख्या रोगांचा धोका कमी होतो.

शारीरिक फायदे :- हृदयविकार:- सायकल चालवल्याने ह्रदय निरोगी राहते आणि हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. 

मधुमेह :- सायकलिंग मुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.  
लठ्ठपणा:- सायकल चालवल्याने वजन कमी होते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.सायकलींग केल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो शारीरिक क्षमता सायकल चालवल्याने शरीराची सहनशक्ती आणि ताकद वाढते कॅलरीज बर्न सायकलिंग मुळे जास्त कॅलरीज बर्न होतात.ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पाय मजबूत करणे :- सायकल चालवल्याने पाय मजबूत होतात. कमी प्रभाव असलेल्या व्यायाम:- सायकलींग हा कमी प्रभाव असलेला एरोबिक व्यायाम आहे.जो सर्व वयोगटासाठी योग्य आहे.

मानसिक फायदे :- मूड सुधारतो सायकल चालवल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.                            ध्यान धारणा :- सायकलींग ध्यान धारणेचा एक चांगला प्रकार आहे. 

मेंदूला सक्रिय ठेवते :-नियमित सायकल चालवल्याने मेंदू सक्रिय राहतो.
पर्यावरणाचे फायदे:- प्रदूषण कमी होते:- सायकल चालवल्याने जीवाश्म इंधनाचा वापर कमी होतो. ज्यामुळे हवेचे प्रदूषण कमी होते.           वाहतूक कोंडी कमी होते:- सायकल चालवल्याने वाहतूक कोंडी कमी होते.                   खर्च कमी होतो:- सायकल चालवल्याने सार्वजनिक वाहतुकीवर होणारा खर्च कमी होतो.                              सायकलींग आपला वजन व्यवस्थापित करण्याचा किंवा तो कमी करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. कारण यामुळे आपले आरोग्य वाढते, स्नायू बनतात आणि शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते. सायकलींग कॅलरी बर्न करण्याचा एक चांगला व्यायाम आहे. आपले रोजचे चक्र 200 कॅलरी कमी करू शकते. सुप्रभात ग्रुप गेल्या तीन वर्षापासून स्थानिक भंडारा येथील आठ ते दहा प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित येऊन सुप्रभात ग्रुप तयार केला या ग्रुपच्या माध्यमातून दर रविवारी भंडारा जवळील पंधराशे वीस किलोमीटर अंतरावरील एका गावी सायकलने जायचं आणि पंधरा ते वीस किलोमीटर सायकलिंग करून भंडारा येथे परत यायचं असा नित्यक्रम या आठ ते दहा सायकल स्वरांनी अंगीकारला आहे यात ओबीसी क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय मते, सेवानिवृत्त प्रा. विद्यानंद  भगत, विधीज्ञ सतीश ठवकर, गोविंद रेहपाडे, यशवंत गायधने, जीवन  सार्वे, श्री. मेहर, सुप्रसिद्ध सुवर्णकार प्रतीन फाए सेवानिवृत्त नायब तहसीलदार शरद घारगडे, दामोदर गभने इत्यादी सन्माननीय सुप्रभात ग्रुपचे सभासद नियमित सायकलिंग करून सुदृढ आरोग्य जगण्याचा प्रयत्न करीत आहे.सर्वांना जागतिक सायकल दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या