चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : दिनांक 08 जुलै रोज मंगळवार ला सर्व धर्म समभाव प्रभुसेवा संस्था चंद्रपुर यांचा प्रथम वर्धापन दिन सोहळा डेबुजी सावली देवाळा येथे सेवाभावी समाज कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा व विविध कार्यक्रमने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक जयेंद्रजी अडगुळवार साहेब होते प्रमुख अतिथी म्हणून गुडृडूजी वर्मा, संघशील सहारे, योगेशजी भांदककर, राजेंद्र भानोसे हे होते. सत्कारमुर्ती म्हणून मोहन तन्नीरवार प्रेमलाल कडुकर, सचिन नक्षीने भद्रावती, रविंद्र येसेकर चंद्रपुर, गणेश वनकर बल्हारपुर व ज्योतीताई लांडगे माजरी यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचीन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
Ilजगा आणि जगु द्या, ll एक हात मदतीचा ll "एक पाहुल पुढे"ll या प्रमाणे मागील एक ते दिड वर्षापासुन मे. आर के सलुन तथा आर के ट्याटू स्टुडिओ बाबुपेठ चंद्रपुरचे मालक, संचालक तथा व्यवस्थापक श्री. रमेशजी हणुमंते यांच्या मनात रस्त्याने फिरणारे मतिमंद, मणोरुग्न, अंध, अपंग, निर्वासीत, निराधार तसेच वाटसरु, लोकांची दयनीय अवस्था बघुन त्याच्या प्रती आपुलकीची भावना जागृत झाली. आणी अशा लोकांसाठी काहितरी सेवा देण्याची भावना निर्माण झाली. यांनी हाच ध्यास आपल्या मनात धरुन ॥जगा आणि जगु द्या, एक,हात मदतीचा, एक पाऊल पुढे॥ हेच ध्येय स्विकारुन पुढे कार्य सुरु ठेवत या कार्याला एक वर्ष पुर्ण झाले या निमीत्य दिनांक 08/07/2025 ला प्रथम वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला.
त्याचेच एक प्रसाद रुपात रस्त्याने फिरणारे मतिमंद, मनोरुग्ण, अंध अपंग, निर्वासीत निराधार मनोरुग्ण यांची मोफत सेवा करण्याचे व्रत घेतला आणी तो दिवस आजचा म्हणजे मागील वर्षी दिनांक 08/07/2024 रोजी. डेबुजी सावली वृध्दाश्रम येथे वृध्द लोकांना सेवा देऊन सर्व धर्म समभाव प्रभुसेवा या सस्थेची स्थापना केली.
या कार्यक्रमाचे यशस्वी करीता संस्थापक अध्यक्ष श्री. रमेशजी हणुमंते यांची टिम श्री अरुण मांडवकर, प्रशांत वाटेकर, सचिन नक्षिणे, दिपक मांडवकर, प्रेमलाल कडुकर, शैलेश कडुकर, रवी घुमे, राजु बनसोड, रोशन चावके, रंजीत हणुमंते,मनीषा मांडवकर, स्नेहा हनवते, दीक्षा . हनुमंते व प्रिया मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन नागपुरे साहेब व अनिलभाऊ बडवाईक यांनी प्रास्ताविक रमेशजी हणुमंते, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन रमेशजी चौधरी यांनी मानले
0 टिप्पण्या