Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीच्या पंचनाम्याची व त्वरीत मदतीची शेतकरी संघटनेची मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा: अतिवृष्टीमुळे व नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई   देण्यात यावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती भंडाराच्यावतीने करण्यात आली आहे 
 याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनानुसार भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीला तसेच  अन्य नदीनाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे धान पिकांचे तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .काही शेतकऱ्यांनी नुकताच रोवणा केला होता तर काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये धानाचे पऱ्हे घातले होते. पुरामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे यात बहुतांश शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहे. या नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी   अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, चैतराम कोकासे, इंद्रजीत येळने, भास्कर साकुरे, राजू थोटे यांनी केली आहे. हे निवेदन जिल्हा अधीक्षक रोहनी पाठराबे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या