Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेकडून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. २८ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हेगार शोध मोहीम व पेट्रोलिंग दरम्यान खात्रीशीर माहितीवरून कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी भद्रावती अप.क्र. ३४८/२५, कलम ३०९(४) भा.न्या.स.अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपीस ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव शिवनारायण उर्फ मनिष बलराम हरिनखेडे (वय २५ वर्ष, रा. मदनपूर, ता. वारशिवनी, जि.बालाघाट, मध्यप्रदेश).येथील असुन

तपासाअंती चौकशी केली असता आरोपीने भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात होंडा शाइन मोटारसायकल (एम एच ३४- सी.ए- ०९२०)–किंमत ८५,ooo/- रु. विवो कंपनीचा मोबाईल फोन – किंमत ५,०००/- रु.असा एकूण ९०,०००/- रुपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेऊन आरोपीस पुढील तपासासाठी भद्रावती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या मोहिमेत API बलराम झाडोकर, PSI सर्वेश बेलसरे, पो.ह.वा. जयसिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, मिलिंद जांभुळे, दिनेश अराडे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, शशांक बदामवार या स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाचा सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या