Ticker

6/recent/ticker-posts

वरोरा रत्नमाला चौकात अलक्झर वाहनाला अचानक आग लागुन खाक



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : चंद्रपुर नागपूर महामार्गावर आज दुपारच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर निवासी आपल्या दोन सहकाऱ्यांसह चंद्रपूर वरून नागपूरला अलक्झर वाहन क्रमांक MH 31 FU 6673 ने निघाले होते वरोराच्या रत्नमाला चौकात पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघू लागला, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ वाहनातून सर्वाना खाली उतरवीत जवळच्या पेट्रोल पंपावरून अग्निविरोधक यंत्र आणण्यास गेले मात्र वाहनाने तोपर्यंत पेट घेतला होता. परत येईपर्यंत वाहन जाळून खाक झाले, मात्र वाहनातील नागरिक वेळेपूर्वी उतरल्याने मोठी घटना टळली अन्यथा मोठी घटना घडली असती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या