Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे:ग्रीन हेरिटेज संस्था


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-कुत्र्यां(शवानां)ना माणसांचा सर्वात चांगला मित्र व सौरक्षक मानले जाते.पण कधी_कधी तर हे आक्रामक होवून आपल्या करिता धोका ही उत्पन्न करू शकतात.कुत्र्यांचे चावा घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कुत्रे लहान_सहान मुलांचा चावा घेणे,त्यांना नोचू_नोचू मारून टाकने,आणि घरचे पाळीव कुत्रे ही उग्र होवून मालकावर धावून पडल्याच्या घटना ही होत आहेत.पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.
घरच्या कुत्र्यांची आपण काळजी घेतो पण स्ट्रीट डॉग ची घेत नाहीत.त्यांचे पिल्लू ( पेटस)रस्त्यावर नाहक आपले जीव गमावतात.
ग्रीन हेरिटेज संस्थेने शहरातील काही ठिकाणी निरीक्षण केले असता भंडारा शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा हैदोस, कहर वाढलेला आहे.ही कुत्रे मुस्लिम लायब्ररी चौकात ठान मांडून बसतात.चौकातून येणाऱ्या_जाणाऱ्या नागरिकांना,शाळकरी मुलांवर भुंकतात,त्यांच्या मागे धावून चावा घेण्याचा प्रयत्न करतात.
नागरिक व मुलांना आपले जीव वाचवून चालावे लागते.मुस्लिम लायब्ररी चौकापासून तर डॉ .देशकर हॉस्पिटल,कुकडे नर्सिंग होम पर्यंत यांची एक मोठी  ३०_३५ कुत्र्यांची  फौज असते.टिळक वार्ड ,निर्वाण गल्ली,महाल वार्ड, आजाद वार्ड, जैन डेरी ची गल्ली,शास्त्री चौक ई ठिकाणी हे कधी १० तर कधी १५ ते २० च्या संख्येने हे मोकाट कुत्रे फिरताना आढळतात.२ दिवसापूर्वी टिळक वार्ड येथे चक्क २० कुत्र्यांची टोळी गल्लीतून "मॉक _ड्रिल"करताना आढळली. परिषद ने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची नसबंदी,निर्बीजीकरण, अँटी_ रेबीज बेक्सिनेशन मोहीम तत्काळ सुरू करून शहरापासून दूर नेणे किंवा जमे पर्यंत त्यांच्या पुनर्वसन करीता शेल्टर होम ची व्यवस्था न. प.ने करावी जेणेकरून या पासून नागरिकांची सुरक्षा पण होवू शकेल.  या बाबत नुकतीच न. प.चे मुख्याधिकारी व प्रशासक मा.करणकुमार चव्हाण यांचे शि ग्रीन हेरिटेज चे संस्थापक मो. सईद शेख यांनी निवेदन व चर्चा केली.त्यांनी या बाबत टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.तरीपण मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची  अत्यंत गरज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या