चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील मोठे व राज्य मार्गालगत असलेल्या हाळीहंडरगुळी सह परिसरातील गावात गत कांही दिवसापासून सातत्याने हवामानात बदल होत असून हा बदल जनतेला "ताप"दायक ठरत असल्याचे दिसते. कारण,गत कांही दिवसापासून पडत असलेला मुसळधार पाऊस त्यामुळे सुटलेला गारठा आणि हे कमी काय व्हायरल इन्फेक्शन (फिव्हर) यामूळे लहानग्यापासून ते वयस्करांपर्यंत मी, मी म्हणणा-यांना सर्दी,ताप,फडसे व अंगदु:खी,खोकला यासारख्या 'ताप' दायक दुखण्याने बेजार केले असून सरकारी दवागान्यासह खाजगी दवाखाने अशा रुग्णांनी हाऊसफुल्ल दिसतात.सरकारी दवाखान्यात रोज १००,१५०ओपीडी,५,१०आयपीडी चे रुग्ण हमखास असतात.अशी माहिती फार्मासिस्ट राऊतांनी दिली. यंदा पावसाने आजवरचे सर्व रेकाॅर्ड तोडले असून आॅगस्ट पर्यंत ओ.पी. डी.कमी होती.पण २७ आॅगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान पावसाने सर्वञ धुमाकूळ घातला आणि सर्दी,ताप, फडसे,खोकला,अंगदु:खी सारख्या रोगांनी डोके वर काढले.व सरकारी दवाखान्यात रुग्णांच्या संख्येंनी शंभरी ओलांडली.यात अनेकांच्या प्लेट लेट्स कमी होत असल्याचे डाॅ. अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे हाळी,वायगाव,वडगाव,शेळगाव, सुकणी,टाकळगाव,मोर्तळवाडी, चिमाचीवाडी,रुद्रवाडी,खरबवाडी, आनंदवाडी,हटकरवाडी,गादेवाडी, वंजरवाडी या आसपासच्या गावात बदलत्या हवामानाचा फटका बसून बेजार झालेले रुग्ण हंडरगुळी येथील दवाखान्यात गर्दी करताना दिसतात. यातील कांहींना व्हायरल ईन्फेक्शन मुळे वरील आजारांशी लढावे लागते. अतिपावसामूळे वातावरणात दररोज होणारा बदल हा अनेकांचा खिसा रिकामा करतोय !
कारण,सरकारी पेक्षा कांही खाजगी डाॅक्टर हे रुग्णांना सरसकट सलाईन (आय व्ही)च लावताना दिसतात.व अशा रुग्णांना १००० रुपयाच्या घरात खर्चा सहजच येतो.पावसामूळे हवामान बदलले.आणि जागोजागी, घरोघरी डासं,माशा यांचे साम्राज्य पसरल्यामूळे लहान,नवजात बालके यामुळे रडकुंडीला आले.तसेच डासां पासून डेंगू,मलेरिया,चिकनगुनिया या सारखे खतरनाक आजार होण्याची भीती आहे.तसेच अचानकच हवा - पाणी बदलत असल्याने अनेकांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होतेय. व याचा सर्वाधिक ञास बालके,जेष्ठ मंडळी यांना होतोय.
ताप,सर्दी,फडसे,खोकला या सारखी लक्षणे २,४ दिवसात कमी नाही झाल्यास तत्काळ वैद्यकिय तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.सरकारी दवाखान्यात रक्त,लघवी,थुंकी तपासणी व ईसीजी या सारख्या म्हत्वाच्या सुविधा उप्लब्ध आहेत.
डाॅ.स्वप्निल संजय काळवणे यांनी ही माहिती दिली.
सध्या हवामान सतत बदलताना दिसते.आणि दु:षपरिणाम जनतेच्या आरोग्यावर होतोय.तेंव्हा सर्दी,फडसे ताप,खोकला व अंग फणफणने हा ञास कोणीही अंगावर काढू नये.व उघड्यावरचे अन्न खाऊ नये.सिंकते वेळेस व खोकतेवेळे नाका,तोंडावर हात व रुमाल ठेवावा.अशी माहिती डाॅ.राजेश भुरेवार यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या