स्वस्त धान्य दुकानदाराची मुजोरी गोरजा गावकरी संतप्त
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : तालुक्यातील गोरजा या गावातील शासकीय स्वस्त धान्य दुकान चालक मंगेश घोरुडे यांच्या विरोधात कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे तहसीलदार मार्फत अन्न पुरवठा मंत्री मंत्रालय मुंबई यांना देण्यात आले मंगेश घोरुडे हे रेशनकार्ड धारकांना दरमहा वितरणासाठी येणारे धान्य संपूर्ण रेशनकार्ड धारकांना न देता त्यांचे धान्य खुल्या बाजारात विकले जात आहे याच प्रकारे रेशन दुकानातील धान्य काही महिण्यापुर्वी खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना दुकान चालक मंगेश घोरुडे यांना गावाकऱ्यांनी रंगेहात पकडून दिले होते. यावर तक्रार सुध्दा केली होती. पण नंतर त्याचे काय झाले हे कळले नाही. असे गावकर्यांनी सांगितले.
या प्रकरणात त्याला मुजोरी आली आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही. माझी मोठ्या अधिकाऱ्यां पर्यंत चांगलीच ओळख आहे.मी तहसीलदार पासून सर्वच लहान - मोठया अधिकाऱ्यांना पैसे देऊन मॅनेज करतो तुम्हास जिथे माझे विरोधात तक्रार करायची आहे तिथे करा अशी गावाकऱ्यांना तसेच रेशन ग्राहकांना धमकावतो तसेच ते दुकान वेळी - अवेळी उघडतात मंगेश घोरुडे हे मुजोरी करते ग्राहकांना शिवीगाळ करते अपशब्दात बोलले जातात जे खरोखर गरीब आहे त्यांना धान्य मिळत नाही परंतु जे श्रीमंत आहे. त्यांचेकडे शेती आहे किव्हा सेवानिवृत्त आहे ज्याचे उत्पन्न जास्त आहे त्यांना धान्य मिळत आहे आणि जे खरोखर गरीब बी पी एल धारक आहे त्यांना धान्य मिळत नाही ग्राहकांना नाहक त्रास होते व ग्राहकांना याची उपासमारी होते.
आपण याकडे लक्ष देऊन रेशन दुकानदाराची चौकशी करून त्याचे लायसन्स रद्द करावे अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तीव्र जनआंदोलन करण्यार येईल असा इशारा निवेदनातून देत आहे
या निवेदनच्या प्रति
विभागीय आयुक्त नागपूर - पोलीस महानिरीक्षक नागपूर - जिल्हा अधिकारी चंद्रपूर - जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर - जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर - उपविभागीय अधिकारी वरोरा - पोलीस उपविभागीय अधिकारी वरोरा यांना देण्यात आले आहे.


0 टिप्पण्या