Ticker

6/recent/ticker-posts

८२ हजाराचा गुटखा ..!वाढवणा पोलीसांनी २ आरोपींना दाखविला खाकीचा हिसकाा..!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-शरीरास हानीकारक असल्याने राज्य शासनाने गुटखा निर्मती व वापरावर बंदी घातली असलीतरीही कांही महाभाग,तस्कर येथून जवळच असलेल्या कर्नाटक राज्यातील कमलनगर,मानकेश्वर,मुर्की या व अन्य गावातून राञंदिवस गुटखा आणतात आणि दिनदहाडे विकतात आणि सगळा कारभार सर्वसामान्य जनतेला दिसतोय.पण अन्न,औषध या खात्याला दिसेना!का,संबंधित अधिकारी खाऊन-पिऊन आंधळे पणाचे सोंग तर घेत नाहीत.ना?
असा प्रश्न नुकताच वाढवणा बुर्द्रूक पोलीसांनी गुटख्यावर केलेल्या कारवाईमुळे सर्व जाणकार जनतेतून चर्चीला जातोय.
याची थोडक्यात माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील वाढवणा बू.पो. स्टे.च्या हद्दीतील नावंदी पाटी येथील महबूब ईसूब सय्यद यांचे शेतातील पञी शेड मध्ये सागर व विमल हा गुटखा विक्री करुन स्व:ताच्या हिता साठी साठवून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळताच स. पो.नि.सुनील गायकवाड,अंमलदार संजय दळवे-पाटील,एस.के.रंगवाळ,संजय कलकत्ते,म.पो.शालिनीबाई लाकाल यांनी नावंदी पाटी येथील एका पञी शेड मध्ये रेड करुन ८२ हजार रुपयांचा गुटखा,सुगंधित जर्दा जप्त केला. 
२ आरोपींवर गुन्हा नोंद करुन धमाकेदार कारवाई केली.या बाबत अंमलदार संजय दळवेपाटील यांनी फिर्याद दिली.म्हणुन आरोपी महबूब रईस सय्यद व सय्यद वासीम आसीफ या २ गुटखा तस्करांविरुध्द गुरनं.२६०/२५ कलम,१२३,२२३, २७४,२७५,३(५) बीएनएस सह. कलम ५९ अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल केला असून,याचा पुढील तपास सपोनि. सुनील गायकवाड हे करत आहेत. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये थरथरटा व घबराट सुटली आहे.तर या धाडसी कारवाईबद्दल पोलीसांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या