Ticker

6/recent/ticker-posts

प्रगती महिला कला महाविद्यालयात विविध उपक्रमाने राष्ट्रीय सेवा योजना दिवस संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:  प्रगती महिला समाज द्वारा संचालित प्रगती महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 याप्रसंगी अध्यक्ष इतिहास विभागप्रमुख डॉ. जी. एन. कळंबे यांनी 'युथ फॉर माय भारत' आणि 'युथ फॉर डिजिटल लिटरसी' या विषयावर   मार्गदर्शन केले. समाज जनजागृती व स्वयंजागृतीसाठी  राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. समाजात होणाऱ्या बदलाला सामोरे जातांना आपल्याला स्वतःहा जागे ठेवणे आवश्यक आहे. काळाची आव्हान स्विकारण्यासाठी डिजिटल लिटरसी असणे गरजेचे आहे. त्यासाठी 'डिजिटली लिटरसी' विकसित ही संकल्पना विकसीत करणे  आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्ष मार्गदर्शनातून सांगितले.
 प्रमुख वक्ता म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री सातोकर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, "राष्ट्रीय सेवा योजना ही चळवळ विद्यार्थिनींना समाजातील प्रत्येक घटकाच्या जवळ जाणारी आहे. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध उपक्रम महत्त्वाची भूमिका निभावतात.  रासेयो निवासी शिबिरातून त्यांच्यात सामाजिक बांधिलकी विकसीत होते. 'नॉट मी बट यु' या संकल्पनेच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं कामही विद्यार्थ्यांद्वारे होत असते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. शालिक राठोड यांनी केले. 
 मार्गदर्शनाच्या कार्यक्रमानंतर 'प्लास्टिक मुक्त परिसर अभियान', स्वच्छता अभियान तसेच स्वच्छता मोहीम संबंधी जनजागृती रॅली विद्यानगर परिसरात काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. रॅलीमध्ये विद्यार्थिनींद्वारे 'स्वच्छता पाळा रोगराई टाळा', 'जिथे स्वच्छता असे तिथे आरोग्य वसे',  'स्वच्छ भारत -आदर्श भारत', 'निसर्गाचे नियम पाळा प्लास्टिकचा वापर टाळा' अशा घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या विविध
 कार्यक्रमाचा आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. क्रिष्णा पासवान यांनी केले होते. राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयातील उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थिनी म्हणून कु. नताशा भलावी, अश्विनी वडतकर, पुनम भेदे, आचल हजारे, स्नेहा कुंभलवार, श्रेया राऊत इत्यादी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. ज्ञानेश्वर हिवसे, डॉ. ज्योत्सना गजभिये प्रा. शुभांगी 
लोंदासे, प्रा. पी. एस. देशमुख, डॉ. शिल्पा बनसोड, श्री संजय वानखेडे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या