Ticker

6/recent/ticker-posts

हिंन्दु-मुस्लिम एकतेचे प्रतिक .....!हंडरगुळीतील सार्वजनिक नवराञ महोत्सव


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-३० वर्षापुर्वी पाटील (जुनी बाजार) गल्ली हंडरगुळी ता.उदगीर येथील हिंन्दु-मुस्लिम युवकांनी एकञ येत या गल्लीत तुळजाभवानी नवराञ उत्सवाची स्थापना केली.तेंव्हापासून आजवर या मंडळात हिंन्दुसह अनेक मुस्लिम बांधव हिरिरीने व स्वयंस्फुर्त पणे सहभाग घेतात.आणि दरवर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात दसरा साजरा करतात.म्हणुन या उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप आलेय.
जेष्ठ पञकार पप्पू पाटील,सुर्यकांत पाटील,जयवंत पाटील,ज्ञानोबा शिनगरवार,आर.डी.मोरतळे,नरहरी माचेवाड,सदाशिव कंदरवाड,मारोती घंटेवाड,स्व.विठ्ठल गुडेवार आदींसह सय्यद जे.के.मोमीन जहीर,अलीसाब शेख,जफर शेख,आलीम शेख या हिंन्दु-मुस्लिम बांधवांनी ३० वर्षापुर्वी नवराञ उत्सवाची सुरुवात केली. आणि गावातील सर्वधर्म समभावाची जुनी परंपरा कायम ठेवली व दसरा सार्वजनिक उत्सव झाला.आणि या नवपिढीतील शेकडो हिंन्दु- मुस्लिम युवकांनी एकञीत येत एकात्मतेची परंपरा कायम ठेवलीय.या उत्सवा दरम्यान दररोज आराधी व इतर विविध धार्मीक कार्यक्रम होतात. आणि हाळी सह परिसरातील सुकणी,आनंदवाडी मोर्तळवाडी, चिमाचीवाडी,रुद्रवाडी इ गावातील महिला भगीणी दर्शनाला येतात.
४ पावलावरच आहे मस्जिद व दर्गा.!
हंडरगुळी येथील पाटील(बाजार) गल्लीत मुस्लिम धर्मियांचे पविञ स्थान असलेली १ खुप जुनी मस्जिद व जिंन्दा शहावली बाबांचा दर्गा आहे  आणि या दोन्हींच्या अगदी समोरच दरवर्षी गणपती व देवीची स्थापना होते.तसेच अजानच्या वेळी स्पिकर तेथे मंडपात उपस्थित असलेले मुलं न सांगता बंद करतात.सबंध नवराञ सोमनाथ मेनमवार,उमेश भोसले,डी. बी.भोसले,दत्ता भोसले,जनू माळी, आनंद अनलदास,ओम औधुते,शाम औधूते,आकाश माचेवाड,महादेव कंदरवाड,शुभम सिनगरवार,व्यंकट शेळके(आराधी),वासीम शेख,शेख एक्बाल,आबुजर मोमीन,सद्दाम शेख,जुनेद शेख यांच्यासह शेकडो हिंन्दु-मुस्लिम युवक एकञित राहून दसरा महोत्सव अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा करतात.हे विशेष..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या