चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-"योग हे निरोगी जीवन जगण्याची कला आहे,आरोग्याचे जतन,संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने योगाचे अवलंबन करावे"असे प्रमुख योग शिक्षक व सत्कारमूर्ती श्री शाम कुकडे यांनी प्रतिपादन केले.ते आपल्या ८२ व्या जन्मदिनावर ८० व ८० वर्षांच्या वरील वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांचे नुकतेच शिवार्पण टॉवर येथे आयोजित सत्कार सोहळा प्रसंगी उदबोधन करीत होते.
या प्रसंगी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी डॉ बाळकृष्ण सार्वे तथा महादेव बांगळकर,रुपेश टांगले, के झेड शेंडे,वामन गोंधुळे, चिंधुजी बुध्दे,पी बी फुंडे,सतराम कौरानी ,उद्धव डोरले,सदानंद इलमे,एस डी शेख,मारोती पुडके,यशवंत बिरे,नेताजी कडव,जीवन सार्वे,हिवराज उके,सुधीर गुप्ता ई मान्यवर पाहुणे या प्रसंगीउपस्थित होते.प्रास्ताविक एस डी शेख यांनी करून शाम कुकडे यांच्या जीवन पटलावर प्रकाश टाकले. तर सूत्र संचालन अतुल वर्मा यांनी केले.
प्रथम मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले .प्रमुख सत्कार मूर्ती शाम कुकडे यांचे पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ,देवून पाहुणे हस्ते सत्कार करण्यात आले.तसेच नारायण साठवणे(९४ वर्ष), झिबल बोंद्रे(८८),बाबुराव डोये (८५),रत्नाकर लेदे(८३),भगीरथ नागलवाडे(८३),भागवत टिचकुले (८२),सदानंद इलमे ((८०) ई वयोवृद्ध ज्येष्ठांचे पुष्पगुच्छ, दुशाला देवून पाहुणे हस्ते सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी डॉ बालकृष्ण सार्वे, महादेव बांगडकर, सदानंद इलमे,रुपेश टांगले,वामन गोंधुळे, चंद्रशेखर डोळस, पी बी फुंडे, मारोती पुडके,उध्दव डोरले ई पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.आभार चींधूजी बुध्दे यांनी मानले.सात्विक अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.मोठ्या संख्येने योग साधक,साधिकांची आवर्जून उपस्थिती होती .


0 टिप्पण्या