लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी हदगाव येथील श्री दत्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी पखवाड्यानिमित्त हिंदी साहित्य अध्ययन मंडळाचा उद्घाटन समारंभ आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीचित्राचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश हिंदी भाषेत रस निर्माण करणे, अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीबद्दल शिक्षित करणे हा होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप काकडे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले आणि विद्यार्थ्यांना त्यांचे विचार सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. शेषराव माने हे होते त्यांनी हिंदी लेखकांचे भाषे प्रती असलेले समर्पण आणि त्यामुळे समृद्ध होत असलेल्या हिंदीचे रूप विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले . त्याचबरोबर हिंदी च्या प्रचारासाठी सोशल मीडिया आणि ब्लॉगिंग चे महत्व त्यांनी व्यक्त केली. समोर बोलत असताना डॉक्टर शेषराव माने यांनी कबीर, तुलसीदास, सूरदास तसेच आधुनिक काळातील प्रसाद पंत निराल तसेच प्रेमचंद यांच्या साहित्यिक कामगिरीचे आणि परिणामी हिंदी भाषेच्या समृद्धीचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष उपस्थितीच्या स्वरूपात संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णा नागेश पाटील आष्टीकर आणि हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक हरिदास बोडके डॉक्टर वीरेश देशमुख आणि इतर शिक्षक उपस्थित होते. हिंदी साहित्य अध्ययन मंडळाच्या उद्घाटनाने आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विषयावरील चित्राचे प्रकाशन करून भित्तीचिञांचे समारंभाची सुरुवात झाली व त्यातून विद्यार्थ्यांची साहित्यिक आवड आणि भाषेबद्दल चा नवीन दृष्टिकोन सुंदर चित्र बघायला मिळाले. आपल्या भाषणात प्राध्यापक हरिदास बोडके यांनी केवळ साहित्य क्षेत्रात नव्हे तर सरकारी आणि खाजगी क्षेत्रातही हिंदी भाषेद्वारे उपलब्ध असलेल्या जागतिक रोजगाराच्या संधीवर भर दिला त्यांनी असेही सांगितले की विकासाच्या आधुनिक युगात हिंदी भाषा ए आय डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले त्यांच्या मते हिंदी भाषा अत्यंत सोपी व्यवहारिक आणि रोजगारक्षम झाली आहे तसेच डॉक्टर वीरेश देशमुख यांनी आपल्या भाषणात हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित केले. तसेच हिंदी भाषेचा सांस्कृतिक वारसा आणि तिच्या संवर्धनासाठी हिंदीची उपयुक्तता अधोरेखित केली. समारंभात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सीमा आवटे हिने स्वागत गीत सादर केले तसेच साक्षी हरण आणि तेजस्विनी शिरगिरे या विद्यार्थिनींनी समारंभाचे सूत्रसंचालन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप काकडे यांनी अध्यक्षीय भाषण केले . शेवटी पूजा शिरसागर बीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने आभार व्यक्त केले महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील डॉ. सुखदेव पाटील प्रा.डॉक्टर अनिल माने करंजीकर आणि प्रा. विशाल राठोड यांनी समारंभ यशस्वी बनवण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर विविध विभागातील प्राध्यापक, अतिथी व्याख्याते, कार्यालयीन कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी हिंदी दिवस सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.


0 टिप्पण्या