चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-हाळी-हंडरगुळी या २ गावातून गेले- ल्या नांदेड-बिदर या अंतरराज्य मार्गावर एक पण गतिरोधक नाही. म्हणुन या मार्गावर वाहनचालकांच्या मनावर विशेषत: अल्पवयीन वाहन चालकांच्या मनावर कसलेच कंट्रोल नसते.म्हणुन अल्पवयीन असलेले चालक गाड्या धूम स्टाईल चालवत असल्याने अधून-मधून लहान-मोठे अपघात होताना दिसतात.म्हणुन बसस्थानक,जि.प.शाळेचे जुने गेट, शिवाजी विद्यालय,वडगाव काॅर्नर इ. ठिकाणी किमान ४ ते ५ गतिरोधक तयार करणे गरजेचे आहे.अशी मागणी या गावभागातील जनतेतून होत आहे.
हाळी-हंडरगुळी या २ गावातून गेले- ल्या अंतरराज्य मार्गालगतच शाळा, काॅलेज,२ बाजारपेठा,ग्रा.पं.पोलीस चौकी,तलाठी,बॅंका,बसथांबे,हाॅटेल या सारखे शासकीय-निमशासकीय कार्यालये असून विद्यार्थ्यांसह५०,६० गावच्या जनतेची व वाहनांची नेहमी या ठिकाणी वर्दळ असते.तसेच हा मार्ग ओलांडेस्तोवर लहान मुले,जेष्ठ व अपंग महिला,पुरुष यांच्या जीवात जीव नसतोच..!
कारण,हा रोड नवीन,टकाटक बनवला असला तरीही या रोडवर गरजेचे असूनही गतिरोधक बसवले नाहीत.म्हणुनच या रोडवरुन दररोज हजारो वाहने सुसाटपणे धावतात. विशेष करुन मिसुरडंही न फुटलेले शेकडो पोरं लहान,मोठी गाडी अति जास्त वेगात व कटा मारत चालवत असतात.म्हणुन अनेकांचा जीव टांगणीला असल्याचे दिसते.
पण संबंधित खाते व त्यांच्या लोकांना अल्पवयीन चालकांची धूम स्टाईल स्टंटबाजी दिसत नाही.याचेच नवल वाटते.
केवळ गतिरोधकांचा अभाव तसेच अल्पवयीन चालकांवर कारवाई करायची धमक संबंधित यंञणेमध्ये नसल्यानेच या रोडवर कधीही मोठा अपघात होऊ शकतो.मगच संबंधित यंञणेचे डोळे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेंव्हा तात्काळ येथे गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.असे मत रामदास सावकार यांनी व्यक्त केले आहे.
गतिरोधकासाठी डांबर लागते.आणि सध्या परतीचा पाऊस सर्वञ पडतोय म्हणुन काम करणे शक्य होणार नाही.तेंव्हा एकदाचा पाऊस थांबला की मग येथे पाहणी करुन कुठे,कुठे बसविणे गरजेचे आहे.तेथे गतिरोधक बसविण्यात येतील.अशी माहिती सुनील नरहारे (उपाभियंता,सा.बां. खाते,उदगीर) यांनी फोनवरुन दिली.


0 टिप्पण्या