पोलीस बंदोबस्त तगडा
तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे चांदूर वर्धा रोड तळेगाव दशासर येथे चकाजाम करण्यात आला
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा असे आश्वासन निवडणुकीच्या आधी फडणवीस सरकारने दिले होते. दिलेल्या शब्द जोपासून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी चका जाम करण्यात आलेला आहे. पाण्यामुळे शेती पिकाचे नुकसान भरपूरझालेले आहे. लावलेल्या मालाचे पैसे आणि मजुरीला दिलेले पैसे शेतकऱ्याला मिळाले नाही. आणि एवढ्या भयान संकटामध्ये शेतकऱ्याचे आत्महत्या चे प्रमाण जास्त वाढले आहे. करिता फडणवीस सरकारने केलेल्या शब्द जोपासून शेतकर्यावर झालेल्या नैसर्गिक आपत्तीला भरपाई करून देण्यात यावी. या मागणीसाठी काँग्रेस कमिटीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकर्याला न्याय देण्यासाठी चकाजाम आंदोलन सुरू केलेला आहे. यापूर्वी उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे येथे कार्यालया मध्ये काळी दिवाळी करून झुणका भाकर खाऊन सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला होता. दिवाळीनंतर शेतकर्याला न्याय मिळाला नाही. अन्यथा चकाजाम करू असे काँग्रेस कमिटीने व माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांनी उपविभागीय अधिकारी यांना माहिती दिली होती. आणि आज नागपूर औरंगाबाद हायवे रोडवरील तळेगाव दशाशर येथे हजारो काँग्रेस चे कार्यकर्ते घेऊन चक्काजाम केले


0 टिप्पण्या