Ticker

6/recent/ticker-posts

हाळीच्या बसस्थानकासमोरील ओपन स्पेस बनला डंपिंग ग्राउंड

दुर्गंधीच बनलीय हाळीची ओळख

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—उदगीर तालुक्यातील हाळी हे बाजार चे गाव म्हणुन नावाजलेले गाव होते. परंतू,अलिकडच्या काळात ही ओळख बदलून घाणीचे,दुर्गंधीचे गाव म्हणुन हाळीची ओळख सर्वदुर झाली आहे.आणि याचा गावच्या सत्ताधा-यांना मोठेपणा वाटतोय.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की,उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या हाळी येथे गुरांचा बाजार भरत नसलातरीही बाजारचे गाव म्हणुनच देशाच्या अनेक प्रांतात ओळखले जायचे.व याचा जनतेला अभिमान,मोठेपणा ही वाटायचा.पण गत कांही काळापासून ही ओळख पुसली गेली.आणि घाणीचे,दुर्गंधीचे गाव अशी नवी ओळख मिळाली. कारण,येथील ग्रा.पं.च्या हद्दीतल्या बसस्थानकासमोर असलेल्या स्पेस वर गावातील कांहीजण घाण टाकत असतात.तर दारु विक्रेते रिकामे  प्लॅस्टिकचे ग्लास व पाणी पाऊच टाकतात.या ठिकाणी टाकलेल्या घाण वस्तूंची दुर्गंधी हवेची झुळूक जसजशी वाढेल तसतशी दुरवर हा घाणवास पसरतो.आणि याचा आस पासच्या रहिवाशांना व या रोडवरुन ये-जा करणा-यांना मोठा ञास होतो तसेच तिरुनदी पुलावर बस येताच वासघाण हाळी गाव आले बघा.असे वाहक,चालक व प्रवाशी बोलत असतात.म्हणुन बस मध्ये असलेल्या हाळीकरांची मान शरमेने झुकते.पण या दुर्गंधीचे व याच दुर्गंधीमुळे हाळी या गावाची होत असलेली छी,थू याचे स्थानिक पुढा-यांना कांहीच देणे,घेणे दिसत नाही.म्हणुनच तर येथील बसस्थानकासमोरील पुला जवळच्या स्पेसला अनेकांनी डंपिंग ग्राउंड बनवले आहे.आणि याचा आसपासच्या जनतेला व येथून ये - जा करणा-या प्रवाशांना,चालकांना हकनाक ञास सहन करावा लागतो. 
गाव तसे चांगले,पण....!
हाळी हे गाव तसे चांगले.पण..पण या गावात असलेल्या एक ना धड भाराभर पुढा-यांनी (चिंध्यांनी) या गावची जुनी चांगली ओळख चक्क गावच्या वेशीवरच टांगली....!
असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
कारण,या दुर्गंधी बद्दल पेपरातून अनेकदा आवाज उठविला.तरीही याविरुध्द या गावातील एकही माईकालाल तसेच ग्राम पंचायतने कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरायचे (कारवाईचे) धाडस केले नाही. म्हणुन हाळी ग्रा.पं.हद्दीततील एसटी.बसस्थानकापुढे नांदेड-बिदर राज्यमार्गालगत असलेल्या ओपन स्पेसला डंपिंग स्पाॅट/ग्राउंड बनवले आहे.म्हणुन याचा सर्वदुर घाण वास पसरत असल्याने बिच्चा-या हाळी - करांची नाचक्की होत आहे.
वादळ,वारे सुटले की हा घाणवास दुरवर जातो.तसेच येथे टाकलेल्या वस्तू वा-याने उडून जातात.तसेच या घाण वासामूळे परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याचे समजते.यामुळे या परिसरातील जनतेचे आरोग्य डेंजर झोन मध्ये आले आहे.तेंव्हा याबाबत कोण व कधी लक्ष देणार?याकडे सुज्ञ हाळीकरांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या