चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-टिळक विद्यालय खंडाळा तालुका साकोली येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात व आदराने साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय ए. एन. निर्वाण सर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच अनिलजी गडपायले तसेच ज्येष्ठ नागरिक बारकूजी गडपायले यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक पी. एन. कापगते, डी. डी. तुमसरे, ए. आर. कुंभरे, आर. एम. भेंडारकर, एम. यु. मेश्राम मॅडम, काशिवार सर यांच्यासह इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सरपंच अनिलजी गडपायले आणि ज्येष्ठ नागरिक बारकूजी गडपायले यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.तसेच, ज्येष्ठ शिक्षक डी. डी. तुमसरे सर, पी. एन. कापगते सर, ए. आर. कुंभरे सर यांनीही आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांनी डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रेरणादायी गीत व प्रभावी भाषणे सादर केली, ज्यामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षाची जाणीव झाली.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती व्हावी या उद्देशाने निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा यांसारख्या विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून एक सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन कु.छन्नू हाताझाडे, कु.साक्षी कापगते यांनी तर आभार प्रदर्शन कु.केसरी करंजेकर हिने करून समारोप करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता एस एम मेंढे, रोकडे व इतर शालेय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या