Ticker

6/recent/ticker-posts

लोककलेचे सादरीकरण संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- महाराष्ट्र शासन नागरी विकास अभियान संचालनालय अमृत अभियान २ च्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पोवाडा, भारुड, गोंधळ या लोककलेच्या माध्यमातू जिल्ह्यातील  भंडारा, साकोली, लाखनी मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर मध्ये भावेश कोटांगले जनजगार पथनाट्य संचाचा समावेश होता. त्यांनी कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रा. लिमिटेड या संस्थेमार्फत विकास रायटे यांच्या नेर्तृत्वात सादर करण्यात आले.
कार्यक्रमात अमृत अभियान २ च्या वतीने शहरातील प्रत्येक घराला नळाने शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करणे, तलाव सरोवर नाले व इतर जलस्त्रोतांचे संवर्धन  व पुनर्जीवन करणे, शहरातील मोकळ्या जागेत उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे, ज्या घरांना अजून नळ नाही त्यांना नवीन कनेक्शन देणे, तलाव विहिरी बंधारे यांचे पुनर्जीवन व खोलीकरण करून पाणीपुरवठा वाढविणे, नवीन उद्याने विकसित करणे,जुन्या उद्यानाचे नुतनीकरण करणे, उढ्यानमध्ये रेंन वॉटर हार्वेस्टिंग, प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरून झाडे जगविणे, अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. जनजागर पथनाट्य टीम मध्ये भावेश कोटांगले, तेजस कोटांगले, प्रल्हाद भुजाडे, करिष्मा भाग्यवंत, अर्चना कान्हेकर, संदिप कोटांगले, गुरुदास राऊत, लक्ष्मीकांत बोरकर, गुड्डू कापगते, प्रशांत मेश्राम यांनी कलाकृती सादर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या